शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी, प्राचार्यांमधील वाद पोहोचला शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला प्राचार्य आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद सोमवारी चांगलाच उफाळून आला. दरम्यान, निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना हाकलून देण्यात आले. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वातावरण चांगलेच तापले होते.शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये परीक्षा तोंडावर असताना, महत्त्वाच्या विषयासाठी सुरुवातीपासून शिक्षक नाही. ...

ठळक मुद्देशेगाव आयटीआयमधील प्रकारपरीक्षा तोंडावर असताना, महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नाहीनिवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना हाकलून देण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला प्राचार्य आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद सोमवारी चांगलाच उफाळून आला. दरम्यान, निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना हाकलून देण्यात आले. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वातावरण चांगलेच तापले होते.शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये परीक्षा तोंडावर असताना, महत्त्वाच्या विषयासाठी सुरुवातीपासून शिक्षक नाही. यामुळे या वर्गातील ४८ विद्यार्थ्यांचा या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्राचार्य राजश्री पाटील यांना सांगितले; मात्र प्राचार्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. शिवाय विद्यार्थ्यांना दमदाटी केल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. दुसरीकडे येथील शिल्प निदेशक ऋषिकेश गडम यांसह काही शिक्षकांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. या सर्व प्रकाराबाबत सोमवारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पाटील यांनी निवेदन हिसकावत सत्य प्रतिवर स्वाक्षरी देण्यास नकार दिला. सोबतच विद्यार्थी आणि शिक्षकांना कॅबिनबाहेर हाकलून देण्यात आले. तसेच बाहेर निघणार नसाल तर पोलिसांत तक्रार देण्याची धमकीही दिल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. दरम्यान, प्रसिद्धी माध्यमांना बोलावून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्य पाटील यांच्याकडून संस्थेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर होणाºया अन्यायाबाबत माहिती दिली, तर प्राचार्य पाटील यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करीत कारवाई न झाल्यास विद्यार्थी परीक्षेवर बहिष्कार घालतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.प्राचार्यांनी मागितले पोलीस संरक्षणविद्यार्थी परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पाटील यांनी परीक्षेच्या काळात पोलीस बंदोबस्त मिळावा, असे पत्र शहर पो.स्टे.ला दिले आहे.