शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मानव विकास’च्या बससाठी विद्यार्थिनींचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:35 IST

बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

ठळक मुद्देविद्यार्थिनींना शाळेत जावे लागते पायी बसफेरी सुरू करण्याची मागणीएसटीच्या विभागीय कार्यालयासमोर विद्यार्थिनींनी केले ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील विद्यार्थीनींसाठी एसटी प्रवासाची मोफत सेवा दिल्या गेली आहे, यात मानव विकास मिशन बस सेवा व अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सेवा या दोन प्रवाससेवा फक्त शालेय विद्यार्थिनीसाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या आहेत. मात्र स्थानिक पातळीवर ही मोफत सेवा देण्यात एसटीचे अधिकारी कुचराई करताना दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील विद्यार्थीनी मोफतप्रवास सेवेपासुन वंचित आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद या गावातील शेकडो विद्यार्थीनी दररोज  शिक्षण घेण्यासाठी ५ किमी अंतरावरुन पायी जात आहेत. वारंवार एसटी महामंडळाकडे मागणी करूनही बस सेवा पुरविली गेली नाही.  किनगावराजा येथे शाळेत जाण्यासाठी जंगलातून पायी वारी करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्रस्त विद्यार्थीनी व पालकांनी सरळ जिल्हा मुख्यालयी धाव घेतली व विभागीय नियंत्रक अनिल मेहतर यांची भेट घेऊन तक्रार करीत मानव विकास मिशनच्या बस सेवा सुरु करण्याची मागणी केली.सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना शाळा सुटल्यानंतर सायंकाळी किनगावर राजा ते उमरद हा प्रवास जंगलातून पायी जावून पूर्ण करावा लागत आहे. पायी गावी परतावे लागत असल्याने पालकांनी यावेळी चिंता व्यक्त केली. आता तात्काळ बससेवा सुरु करून मुलींना न्याय द्यावा अशी मागणी पालकानी यावेळी केली आहे. आजपासून बससेवा सुरु केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप नेते विनोद वाघ यानी दिला आहे. हा प्रश्न फक्त एका जिल्ह्याचा नसून संपूर्ण राज्यातील विद्यार्थिनीचा आहे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विनोद वाघ यांनी केली आहे.