शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: September 6, 2014 01:15 IST

मोताळा तालुक्यातील बोरखेड येथील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

मोताळा : तालुक्यातील तरोडा परिसरातील बोरखेड भागात असलेल्या नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज ५ सप्टेंबर रोजी दुपार दरम्यान बोरखेड शिवारातील नदीमध्ये घडली. तरोडा येथील रेशन दुकानदार तारसिंग डांगे यांचा एकुलता एक मुलगा आश्‍विन डांगे वय १८ हा विद्यार्थी ५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेदरम्यान बोरखेड शिवारातील नदीमध्ये रेती भरण्यासाठी गेलेल्या स्वत:च्या ट्रॅक्टरजवळ गेला असता. नदीच्या पाण्यामध्ये पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही. याबाबत आश्‍विनने ट्रॅक्टरवर काम करीत असलेल्या मजुरांना कल्पना दिली; मात्र तासभर उलटूनही आश्‍विन परत न आल्याने त्याची शोधाशोध सुरू केली असता नदीच्या काठावर त्याचे कपडे दिसले; मात्र आश्‍विन दिसला नसल्याने मजुरांनी पाण्यात उडी मारून शोध घेतला असता, आश्‍विनचा मृतदेह खोल पाण्यात फसलेला आढळला. आश्‍विन हा बुलडाणा येथील राजीव गांधी मिलीटरी स्कू लमध्ये अकरावी पास झाला होता. पुढील शिक्षणासाठी आपल्या एकुलत्या एक मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी आई-वडिलांनी त्याला नाशिकला पाठविले होते. गणपती उत्सवानिमित्त आश्‍विन तरोडा येथे आला होता. उदय़ा तो नाशिकला निघणार होता; परंतु आईच्या आग्रहाखातर एक दिवस घरी थांबला होता; मात्र नियतीने येथेच घात केला. चांगल्याप्रकारे पोहता येत असल्यावरही पाण्यात उडी मारल्याबरोबर झाडाच्या मुळांमध्ये पाय फसल्यामुळे आश्‍विन वर आलाच नाही. या घटनेमुळे संपूर्ण तरोडा गावावर शोककळा पसरली आहे.