शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाविरुद्ध गावक-यांचा संघर्ष प्रेरणादायी-सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:52 IST

धामणगाव बढे : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून झपाटल्यागत काम करणा-या, गाव पाणीदार करण्याचा संकल्प करणा-या व एकजुटीने दुष्काळाशी पंगा घेणा-या सिंदखेडवासीयांचा संघर्ष प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा सिंदखेड येथे श्रमदानाचं ‘तुफान आलया’; रात्री बारा वाजता गावकरी एकवटले

नवीन मोदे । लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे(बुलडाणा) : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून झपाटल्यागत काम करणा-या, गाव पाणीदार करण्याचा संकल्प करणा-या व एकजुटीने दुष्काळाशी पंगा घेणा-या सिंदखेडवासीयांचा संघर्ष प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.७ एप्रिलच्या रात्री १२ वाजेला सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा संपूर्ण राज्यात प्रारंभ झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व श्रमदानासाठी आ. हर्षवर्धन सपकाळ सिंदखेड येथे आले होते. रात्री १२ वाजता सिंदखेड येथील सुमारे ४०० महिला, पुरुष, अबाल, वृद्ध श्रमदानासाठी एकवटले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जि.प. सदस्य अ‍ॅड. गणेशसिंग राजपूत, प्रवीण कदम प्रामुख्याने उपस्थित होते. गावक-यांच्या जिद्दीने व भीतीने दुष्काळ वेशीवर आला. पुढील ४५ दिवसात त्याला हद्दपार व्हावे लागेल, असे यावेळी उपजिल्हाधिकारी व-हाडे यांनी सांगितले. ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. सिने अभिनेते आमिर खान यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे. याचे सकारात्मक परिणाम मागील दोन वर्षात दिसत आहे, तर यावर्षी राज्यातील ४ हजार खेडी यामध्ये सहभागी झाली आहेत.सिंदखेडवासीयांनी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, आगपेटी मुक्त शिवार, माती परीक्षण नर्सरी, पाणीबचत तंत्रज्ञान, शोषखड्डे यासारखी पूर्वतयारी याअगोदरच पूर्ण केली. विशेषत: या उपक्रमास महिलांचा सहभाग लक्षणीय असून, नुकतीच महिलांनी जनजागृतीसाठी मशाल रॅली काढली होती. सिंदखेड येथे ७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता औपचारिक उद्घाटनानंतर प्रत्यक्ष श्रमदानास गावक-यांनी प्रारंभ केला. दुष्काळाला हद्दपार करून गाव पाणीदार करण्याचा संकल्प गावकºयांनी केला आहे. त्यासाठी गावकरी, पाणी फाउंडेशन, जिल्हा प्रशासन एकवटले आहे.प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात काटेकोर नियोजन, युवकांचा प्रचंड प्रतिसाद, गावाची एकजुटता आणि प्रशासनासाठी साथ यामुळे सिंदखेडमध्ये ‘तुफान आलया’ आणि परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन, पाणी फाउंडेशन कामावर लक्ष ठेवून आहे, तर ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर गावात तळ ठोकून आहे. सिंदखेड येथे श्रमदानासाठी बाहेर गावावरून येणा-यांसाठी जेवणाची व्यवस्था, श्रमदानासाठी साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा