शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

उभ्या ट्रकला धडक; १२ जखमी

By admin | Updated: June 5, 2014 22:09 IST

मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील घटना

मलकापूर : लग्नाचे वर्‍हाड घेवून मुक्ताईनगरकडून आलेल्या टाटा ४0७ या वाहनाने उभ्या ट्रकला धडक दिल्याने १२ जण जखमी झाल्याची घटना आज ५ मे रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाहतूक पोलिस मदत केंद्राजवळ घडली.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ट्रक क्र. आर. जे. 0७ जि. ए. २00२ हा ट्रक राष्ट्रीय महामार्ग ६ वरुन मुंबईकडून नागपूरकडे जात होता. १२ वाजेच्या सुमारास महामार्गावरील पोलिस मदत केंद्रानजिक पोलिसांनी त्याला थांबविले. तेवढय़ात मागून लग्नाचे वराड घेवून येणार्‍या टाटा ४0७ ने ट्रकला धडक दिली. त्या अपघातात प्रदीप ज्ञानेश्‍वर भोई वय २५, मधुकर सांडू भोई वय ३५ रा. चांगदेव, बळीराम नागो भोई वय ५0 रा. सिंगारधन, आत्माराम शालीग्राम भोई वय २५ रा. इच्छापूर, शालीग्राम सखाराम भोई वय ५0 रा. इच्छापूर, अजय विजय साबळे वय १५ रा. मुक्ताईनगर, राघो देवरा भोई वय ६0 रा. सिंगारधन, नारायण शिवाजी भोई वय ६0 रा. सिंगारधन, प्रकाश देवचंद भोई वय ३५ रा. घटकुल, तुकाराम काशिराम भोई वय ५0 रा. सावरगाव जामनेर, श्रीनाथ अरुण भोई वय ३५ रा. मिर्झापूर व एक असे १२ प्रवासी शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मार लागल्याने जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.