शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण डाक कर्मचारी १६ ऑगस्टपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:08 IST

बुलडाणा : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतातील संपूर्ण ग्रामीण डाकसेवक १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

ठळक मुद्देग्रामीण डाकसेवकांना अद्याप खात्यामध्ये समाविष्ट केलेले नाहीतुटपुंजा पगारावर करावा लागतोय कुटुंबाचा उदरनिर्वाहविविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बेमुदत संपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतातील संपूर्ण ग्रामीण डाकसेवक १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. ब्रिटिश राजवटीने भारतात सुरू केलेल्या काही मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या टपाल खात्याने आजच्या अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेच्या काळातही आपले अस्तित्व जपण्याची धडपड कायम ठेवली आहे. टपाल विभागाला १५0 वर्षे होऊन गेलीत, तरीसुद्धा ग्रामीण डाकसेवकांना अद्याप खात्यामध्ये समाविष्ट केलेले नाही. तुटपुंजा पगारावर त्यांना कुटुंबाचा भार सांभाळावा लागत आहे. मागील केलेल्या संपाच्या आश्‍वासनाची वाट पाहता अद्याप खात्यामध्ये समाविष्ट केले नाही. मागील सरकारने ६0 वर्षांत ग्रामीण डाकसेवकांकडे लक्षच दिले नाही. तेव्हा संचारमंत्री सुषमा स्वराज व रामविलास पासवान होते. सध्या सरकार भाजपचेच आहे. कमलेशचंद्र कमिटीने सादर केलेल्या अहवालाला संचारमंत्र्यांनी मंजुरात दिलेली आहे व आपल्या शिफारशीची फाइल वित्तमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेली आहे. अद्याप वित्तमंत्रालयाने मंजुरात दिली नाही. त्यामुळे जनरल सेक्रेटरी एस.एस. महादैवया दिल्ली यांनी १४ ऑगस्टपर्यंत काही न झाल्यास १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचे आदेश दिले आहे. सरकारला याआधी ३0 जून रोजी बेमुदत संपाची नोटिस दिलेली आहे.  यावेळी जीडीएस कमिटीचा अहवाल संघटनेने दिलेल्या सूचनानुसार लवकर लागू करा. जीडीएसला आठ घंटे काम देऊन खात्यात समाविष्ट करा. जीडीएसला पेन्शन योजना लागू करा. जीडीएसच्या टारगेटच्या नावाखाली शोषण बंद करा, आदी मागण्या पूर्ण संप करण्यात येणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष अरुण भानुसे यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे व आपल्या जिल्ह्यात संप १00 टक्के यशस्वी करा, असे आवाहन अरुण भानुसे, कॉ.पी.एस. झाडोकार, कॉ.एस.एस. ढोणे, कॉ.डी.ओ.पाटील, कॉ.जी. आर. देशमुख, रवी निकम, रमेश भवर, दिलीप पाटील यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे.