शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीपेक्षा अधिक रेतीची साठवणूक; समीर दलाल यांना ८० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 13:15 IST

Khamgaon News : तहसीलदारांनी समीर दलाल यांना ८० लाखांचा दंड ठोठावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून रेतीचे उत्खनन आणि साठवणूक केल्याप्रकरणी शासन निर्देशाची पायमल्ली करणे लिलावधारकाच्या चांगलेच अंगलट आले. परवानगीपेक्षा ७१० ब्रास अतिरिक्त रेतीची साठवणूक केल्याप्रकरणी लिलावधारक समीर दलाल यांना ७९ लक्ष ८३ हजार ९५० रुपयांचा दंड ठोठाण्यात आला. शेगाव येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे रेती माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाटातून लिलाव धारकांकडून क्षमतेपेक्षा रेतीचा उपसा केल्या जात असल्याचे वास्तव माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उजेडात आणले. त्यानंतर  सानंदा यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाºयांना तात्काळ स्थळ निरिक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी महसूल प्रशासनाला शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील  रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिय्ये यांचे नव्याने स्थळ निरिक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. यामध्ये शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील ईटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून परवानगी पेक्षा अधिक रेतीची उचल झाल्याची वस्तुस्थिती समोर आली. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी केल्यानंतर ७१० ब्रास रेतीचा अतिरिक्त साठा केल्याप्रकरणी समिर दुष्यंत दला यांना दंड ठोठावण्यात आला आहे. आठ दिवसाच्या आत या दंडाचा भरणा करण्याची नोटीसही संबंधितास बजावण्यात आली आहे.

 खुलासा संयुक्तीक नसल्याचा ठपका!-माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या तक्रारीवरून ५ लिलावधारकांपैकी तीन लिलावधारकांवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. दरम्यान, समीर दलाल यांचा खुलासा संयुक्तीक नसल्याचा ठपका महसूल प्रशासनाने ठेवला असून विक्री रेकॉर्ड, हिशोब नोंदवही, मासिक नोंदवही, सीसी फुटेज, वाहतूक पासेस आणि अतिरिक्त रेतीसाठ्याबाबत संयुक्त खुलासा दलाल यांनी सादर केला नसल्याचेही तहसीलदार बोबडे यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.

 

परवानगी पेक्षा अतिरिक्त रेतीची साठवणूक, परवाना पासेससाठी बनावट दस्तवेज तयार करणे, रेती आणि रायॅल्टीची चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे लिलावधारकांकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी आपली मागणी आहे. विभागीय आयुक्तांनी नेमणूक केलेल्या पथकाकडून तांत्रिक पध्दतीने तपास केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे.- दिलीपकुमार सानंदातक्रारकर्ते तथा माजी आमदार खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावRevenue Departmentमहसूल विभाग