शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले, प्रत्येक बसचे कळणार लाइव्ह लोकेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीमध्ये अत्याधुनिक सेवासुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही वर्षभरापूर्वी शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. ...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीमध्ये अत्याधुनिक सेवासुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही वर्षभरापूर्वी शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा होऊ लागली आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी इंटरनेट वायफाय अन् करमणुकीसाठी टिव्हीचा प्रयोग करण्यात आला होता; परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. दरम्यान, प्रवाशांना आपल्या बसचे लोकेशन कळावे, यासाठी महामंडळाने नवीन सिस्टम कार्यान्वित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. प्रवाशांना वेळेवर माहिती मिळावी, म्हणून पब्लिक इन्फॉरमेशन सिस्टम पीआयएस कार्यान्वित करण्यात आली आहे. बसवर देखरेख ठेवण्यासाठी व्हीटीएसची मदत होणार आहे. व्हेईकल ट्रॅकिंग

सिस्टम कार्यान्वित असून, त्यातून वेगवेगळे रिपोर्ट काढता येतात. भविष्यात या सिस्टमच्या माध्यमातून एक मोबाइल ॲप तयार करण्यात येणार असून, प्रवाशांना त्यातून प्रत्येक अपडेट मिळू शकेल.

गाडीची स्पीड, लोकेशनही कळणार

अपघातांना आळा घालण्यासाठी गाडीची स्पीड नियंत्रणात असणे गरजेचे आहे. ठरवून दिलेल्या स्पीडपेक्षा जास्त वेगाने गाडी पळविल्यास आता याची माहिती नियंत्रण कक्षाला व्हीटीएस सिस्टमद्वारे मिळणार आहे. गाडीचे लोकेशनही या माध्यमातून कळणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. एसटीचा प्रवास हा खरोखरच सुखी व सुरक्षित बनणार आहे. यादृष्टीने एसटी महामंडळाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

बुलडाण्यात व्हीटीएस अन् पीआयएस कार्यान्वित

बुलडाणा विभागात व्हीटीएस आणि पीआयएस अशा दोन्ही सिस्टम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ४०५ बसेसमध्ये व्हीटीएस सिस्टम बसविण्यात आली आहे. विभागातील १७ बसस्थानकांमध्ये एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. छोट्या बसस्थानकांमध्ये एक तर मोठ्या बसस्थानकांमध्ये प्रत्येकी दोन स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत.

-ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.

बसस्थानकात लागले मोठे स्क्रीन

प्रवाशांना बसच्या वेळा कळाव्यात तसेच इतर माहिती मिळावी, या उद्देशाने मोठे स्क्रीन बसविले आहेत. बुलडाणा विभागातील बसस्थानकांमध्ये प्रत्येकी एक स्क्रीन आणि बुलडाणा मध्यवर्ती बसस्थानकासह मोठ्या बसस्थानकांमध्ये दोन एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या असून, त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. आजघडीला या स्क्रीनच्या माध्यमातून बसच्या वेळा तसेच आरक्षित जागांविषयी माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना जाण्यासाठी बस आहे का, असे चौकशी कक्षात विचारण्याची गरज नाही.

चालकांच्या निष्काळजीला बसणार चाप

एसटीमध्ये बसविण्यात येणाऱ्या नवीन सिस्टममुळे चालकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे आपसुकच चालकांकडून होणाऱ्या निष्काळजीला चाप बसू शकतो. बसचे प्रत्येक लोकेशन आजघडीला आगारप्रमुख आणि स्थानकप्रमुख यांना दिसत आहे. त्याचबरोबर बसची स्पीड, बसचे ब्रेक कोणत्या पद्धतीने मारले, रॅश ड्रायव्हिंग यांसह विविध प्रकारचे जवळपास ३५ रिपोर्ट या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून काढता येणार आहेत.