शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभातील विकृत प्रथा थांबवा! मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकरांचे आवाहन

By ब्रह्मानंद जाधव | Updated: April 18, 2023 20:31 IST

बहुजन समाजास केल्या मार्गदर्शक सूचना

चिखली : अलीकडील काळात लग्नावर पैशांची प्रचंड उधळपट्टी होते. लग्न वेळेवर लागत नाही, यासह मरणदारीसुद्धा अनेक वाईट प्रथा रूढ होताहेत. लग्न समारंभातील विकृत प्रथा थांबविण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. तथापि यातून बहुजन समाजाने बाहेर पडावे, असे आवाहन करतानाच काही मार्गदर्शक सूचनादेखील त्यांनी केल्या आहेत.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा बहुजन समाजामधील लग्न कार्यातील अनेक विकृत बाबींवर चिंता व्यक्त केली. लग्न समारंभ दिवसेंदिवस अतिशय खर्चिक होत चाललेले आहेत. यामध्ये समाजाचे तसेच कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध:पतनसुद्धा होत असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी बहुजन समाजासाठी विविध मार्गदर्शक विचारदेखील दिला आहे. सोबतच काय करायला हवे, काय नको, याबाबत एक नियमावलीदेखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभात अवास्तव उधळपट्टी थांबवा, असे स्पष्ट केले आहे. डीजेमुळे हृदय रुग्ण, ध्वनी प्रदूषण होते. सोबतच वरातीत अगदी मुलेसुद्धा दारू पिऊन नाचायला लागलेली आहेत, ही विकृती वेळीच थांबवायला हवी, म्हणून लग्न समारंभात दारू व डीजेमुक्त लग्न संकल्पना राबविण्याबाबत त्यांनी सूचित केले.

ग्रामसभेत ठराव घ्या!१ मेला सर्व गावांमध्ये ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभेमध्ये किमान डीजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात व वेळेवर लग्न हे तीन ठराव घ्यावेत, समाजातील सर्व विचारवंतांनी, विविध पक्षांतील कार्यकर्ते, नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास परिवर्तनाला केवळ सुरुवातच नाही, तर वेगही मिळेल. पक्षीय राजकारणाचा विचार न करता या पुरोगामी विचार धारेला, परिवर्तनाच्या चळवळीला आपापल्या परीने सहकार्य करावे, असे आवाहन खेडेकर यांनी केले.

काय आहेत सूचनाखेडेकरांनी लग्न जुळविण्यापासून तर त्याच्या पूर्णत्वानंतर काय करणे आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. यामध्ये कुणबी, मराठा, देशमुख, पाटील, राजपूत यांच्या नातेसंबंध जुळावेत, हलके भारी हा भेदभाव टाळावा, आंतरधर्मीय, आंतरजातीय व आंतरराष्ट्रीय प्रेम विवाहांचा स्वीकार करावा, अंधश्रद्धा टाळावी, लग्न वेळेवर लावावेत, अनाठायी खर्च टाळावा, हुंडा टाळावा, प्री-वेडिंग, असे प्रकार टाळावे, या व इतर ३८ सूचना खेडेकरांनी केल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा