शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धाड येथे ‘प्रहार’चा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:46 IST

धाड : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीसह राज्यात स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कृषी क्षेत्रावरच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशा विविध मागण्यांकरिता धाडमध्ये सोमवारला प्रहार संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते व अपंग क्रांतीचे संजय इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते व अपंग क्रांतीचे संजय इंगळे यांच्या नेतृत्वातछत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला आंदोलनात धाड परिसरातून अनेक प्रहारचे कार्यकर्ते हजर

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीसह राज्यात स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कृषी क्षेत्रावरच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशा विविध मागण्यांकरिता धाडमध्ये सोमवारला प्रहार संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते व अपंग क्रांतीचे संजय इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला.शासनाने शेतकरी कर्जमाफी देताना दुजाभाव करत शेतकर्‍यांवर अन्याय केला असून, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीची आवश्यकता आहे. परिणामी, सध्या शेतकरी हैराण असून, राज्यात स्वामिनाथन आयोग लागू करावा व अपंग पुनर्वसन कायदा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. सोमवारला सकाळी १0 च्या सुमारास स्थानिक शिवाजी महाराज चौकात प्रहारचे ध्वज घेऊन असलेले १२५ च्यावर कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर रोडवर ठिय्या मांडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या जाहीर करून रास्ता रोको आंदोलन पूर्ण केले.शेतकर्‍यांना सरकारने संपूर्ण कर्जमाफी देऊन स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, अशा घोषणा देत तासभर वाहतूक खोळंबून ठेवली. या ठिकाणी ठाणेदार संग्राम पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले व त्यांच्यावर कलम ६८ प्रमाणे ताब्यात घेऊन ६९ प्रमाणे मुक्त केले. या आंदोलनात धाड परिसरातून अनेक प्रहारचे कार्यकर्ते हजर होते.