शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

देऊळघाटवासीयांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 01:59 IST

दोन गावात पाण्यासाठी संघर्ष; आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित

बुलडाणा : तालुक्यातील दहीद बु. धरणावरून देऊळघाटसाठी असलेल्या पाइपलाइनचे काम दहीद ग्रामवासीयांनी अडवले आहे, ते काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात यावे व पाणी पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी ९ वाजता देऊळघाट बसस् थानकावर एक तास 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. बाराही महिने पाणी टंचाईचा सामना करणार्‍या देऊळघाटमधील विहिरी, हातपंप ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्येच आटतात, तसेच गावात पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने गावातील जनतेला पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. या गावासाठी दहिद येथील धरणावरुन पाइ पलाइन टाकलेली असून, तेथे विंधन विहीर व विहीर आहे; परंतु मागील दहा वर्षे या पाणी पुरवठा योजनेकडे ग्रामपंचायत व तत्कालीन सरपंचांनी दुर्लक्ष केल्यामुळे पाइपलाइन खराब झाली, तसेच देऊळघाटच्या विहिरीवर दहिद ग्रामपंचायतीने ताबा करुन दहिदसाठी पाणी पुरवठा सुरु केला आहे.दरम्यान, देऊळघाट ग्रामपंचायतमध्ये सत्तापालट झाल्यानंतर नवीन सर पंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी दहिद पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी शासनाकडे रेटा धरला. तेव्हा शासनाकडून पाइपलाइन दुरुस् तीसाठी जवळपास १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पाइपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी जेसीबी मशीन दहिद धरणावर पोहोचली असता, तेथील काही नागरिकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून काम करू दिले नाही. एकीकडे देऊळघाटवासी पाण्यासाठी भटकंती करत आहेत तर दुसरीकडे दहिद ग्रामपंचायतने देऊळघाटला पाणी न देण्याचा ठराव घेतला. त्यामुळे देऊळघाट ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सर पंच आरिफ खान, उपसरपंच बंडू सपकाळ, ग्रा.पं.सदस्य मुश्ताक अहेमद, हाजी इद्रीस बागबान, गजनफर खान, विकास देशमुख, बाळू लवंगे, युनूस खान, याकुब पठाण, कदिर ठेकेदार, साहेबराव खंडारे, रमेश गोरे, प्रशांत देशमुख, सखाराम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान, प्रा.मो.युसूफ अन्सारी, चंदु सपकाळ, शेख इसराईल, गुलाम रसुलखान, सै.इमरान, शेख दय्यान, हमीद खान, मनशाऊर रहेमान, दिलीप खराडे, केशव जाधव, सतीश टेलर, शेख आरिफ, इमरान हार्डवेअर, रिजवान देशमुख, साबीर खान, सय्यद तजम्मुल, नंदु लवंगे, सलिमखान, युसूफ टेलर, जुबेर खान, सय्यीद खान, शेख अमान, शेख दैयान, स. युबेद, स.कालु, अनिस खान, शेख उस्मान यांच्यासह देऊळघाट येथील असंख्य नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार ए.बी.भामरे, एपीआय निचळ मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन हजर होते.