बुलडाणा : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यात सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये १0 फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते; परंतु सोनेवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना गोळ्यांमुळे विषबाधा झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांनी या घटनेची धास्ती घेतल्याने शाळा, अंगणवाड्यामध्ये विद्यार्थ्यांंना जंतनाशक औषधीचे वाटप बंद करण्यात आले. चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत १0 फेब्रुवारी रोजी या जंतनाशक गोळ्यांमुळे जवळपास ३३ मुलांना विषबाधा झाली होती. त्यांना बुलडाणा येथे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती सर्वत्र प्रकाशित होताच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी धास्ती घेतली असून, पालक वर्गसुद्धा शाळेत जाऊन मुलांना जंतनाशक औषधी न देण्याची विनवणी शिक्षकांना करीत आहे. त्यामुळे शिक्षकांनीसुद्धा औषधीचे वाटप बंद केले आहे.
जंतनाशक औषधीचे वाटप बंद
By admin | Updated: February 11, 2015 23:56 IST