शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची मनमानी वसुली तातडीने थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:08 IST

अचानकपणे पालिकेडून भूखंड खरेदीच्या किमतीवर अर्धा टक्क्यानुसार फी आकारल्या जात असल्याने यावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आक्षेप घेतला असून, पालिकेने ही मनमानी वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे मालमत्ता हस्तांतरणाच्या पावतीबाबत मनसेने विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : नगरपालिका हद्दीतील मालमत्तेचे हस्तांतर करण्यासाठी यापूर्वी चिखली नगरपालिकेत १५0 रुपयांची पावती फाडावी लागत होती; मात्र यामध्ये अचानकपणे पालिकेडून भूखंड खरेदीच्या किमतीवर अर्धा टक्क्यानुसार फी आकारल्या जात असल्याने यावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आक्षेप घेतला असून, पालिकेने ही मनमानी वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे.चिखली नगरपालिकेत यापूर्वी मालमत्ता हस्तांतरण करावयाचे असल्यास नाममात्न १५0 रुपयांची पावती फाडावी लागत होती; मात्न आता नगरपालिका प्रशासनाकडून भूखंडाच्या खरेदी किमतीवर अर्धा टक्का वसुली सुरू असल्याचा आरोप बरबडे यांनी केला असून, यानुसार एखादा भूखंड पाच लाख रुपयांत खरेदी केल्यास ती मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी भूखंड हस्तांतरण फी म्हणून अडीच हजार रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे. ही बाब काही जागरूक नागरिकांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या लक्षात आणून दिली असताना बरबडे यांनी याबाबत नगरपालिकेत केलेल्या चौकशीमध्ये नगरपालिकेच्या सभागृहाने पारित केलेल्या ठरावानुसार ही वसुली सुरू असल्याचे समजले. प्रत्यक्षात शासनाच्या कोणत्या निर्णयानुसार ही वसुली सुरू आहे, याबाबतही खुलासा झालेला नाही तर नगरपालिकेचे कर्मचारी ज्या ठरावाचा दाखला देत आहे, तो ठराव नगरपालिकेने २२ फेब्रुवारी २00७ रोजी पारित केलेला असून, त्याची अंमलबजावणी २0१७ पासून चालविली आहे. त्यामुळे त्या  ठरावावरच शंका उपस्थित करून ठरावानंतर नगरपालिका गेली दहा वर्षे झोपली होती का,   आताच या ठरावाची अंमलबजावणी का सुरू आहे, असा सवाल बरबडे यांनी उपस्थित केला असून, ही बाब गंभीर स्वरूपाची असून, जनसामान्यांच्या खिशातून पैसे उपसण्याचे काम नगरपालिका करीत  असल्याचा आरोप करीत मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे ही फी वाढ रद्द करण्याची मागणी केली असून, कोणत्याही मूलभूत सुविधा व्यवस्थित न पुरविणार्‍या नगरपालिकेला कुठलीच करवाढ करायचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे मालमत्ता हस्तानंतरणात केलेली करवाढ रद्द व्हायला हवी, कारण भूखंडधारक खरेदीच्या वेळेसच जी नोंदणी फी व मुद्रांक शुल्क भरल्या जाते, त्यामध्ये एक टक्का अधिभार हा नगरपालिकेसाठीच असतो. त्यामुळे पुन्हा नवीन अधिभार घेण्याचा नगरपालिकेस कुठलाही अधिकार नसल्याचे बरबडे यांनी स्पष्ट केले असून, पालिकेमध्ये जोपर्यंत नगरपालिका लेखी शासन निर्णय दाखवत नाही, तोपर्यंत नागरिकांनीदेखील अर्धा टक्का मालमत्ता हस्तांतरणाची रक्कम भरू नये, असे आवाहन बरबडे यांनी केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार, गजानन सोळंकी, प्रदीप भवर, प्रवीण महाडिक, रवी पेटकर, अजय खरपास आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका