शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लांजुड येथील उपोषणकर्त्यांवर रात्रीच्या अंधारात दगडफेक

By सदानंद सिरसाट | Updated: January 14, 2024 18:06 IST

गावातीलच काही समाजकंटकांनी शनिवारी मध्यरात्री उपोषण मंडपावर दगडफेक केली.

खामगाव (बुलढाणा): गावातील देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालय चौकात उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित पोलिसावर शनिवारी रात्री १०.४७ वाजता दगडफेक केल्याची घटना तालुक्यातील लांजुड येथे घडली. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी उपोषणकर्त्याने जलंब पोलिसांत तक्रार दिली आहे. 

लांजुड गावातील तरुणांमध्ये वाढती व्यसनाधिनता, त्यातून होणारे वाद टाळण्यासाठी गावातील देशी दारूचे दुकान हटवावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून उमेश निवृत्ती जस्ताब यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा शनिवारी तिसरा दिवस होता. गावातील नागरिकांच्या हितासाठी उपोषण असल्याने ग्रामस्थांचा दैनंदिन पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे गावातीलच काही समाजकंटकांनी शनिवारी मध्यरात्री उपोषण मंडपावर दगडफेक केली. त्यावेळी उपोषणकर्ता उमेश जस्ताबसह गस्तीवर असलेले एक पोलिस काॅन्स्टेबल, गावातील गजानन कोतवाल, विनायक ठाकरे, संतोष मालठाणे, गोपाल चव्हाण, भगवान मालठाणे, अनंता शिंदे मंडपात उपस्थित होते. अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी दगडफेक केली. यावेळी मंडपात उपस्थित असलेल्यांनी प्रसंगावधान राखत बचाव केला. त्यामुळे कोणालाही काही इजा झाली नाही.  दगडफेक करणाऱ्यांचा काही लोकांनी पाठलाग केला. मात्र, अंधारात ते पळून गेले. घटनेची माहिती गावात मिळताच नागरिक प्रचंड संतप्त झाले. नागरिकांनी उपोषणस्थळी गर्दी केली. तसेच दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. सोबतच जलंब पोलिसांत तक्रार दिली आहे.  

अतिक्रमणाच्या जागेत दारू दुकानगावात सुरू असलेल्या देशी दारू दुकानाच्या जागेच्या मालकीचा आठ-अ नमुना अवैध असल्याची माहिती उपोषणकर्त्याने वरिष्ठ कार्यालयात दिली आहे. त्यामुळे त्या आठची नोंद कोणत्या सरपंच आणि सचिव यांनी कशाच्या आधारे घेतली, हा मुद्दा आता उघड होणार आहे. गावात असलेल्या रेकॉर्डमध्ये कोणताही फेरबदल त्यांना करता येणार नाही. त्यामुळे आता संबंधित सरपंच, सचिवही कारवाईच्या कचाट्यात अडकणार आहेत.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा