शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST

भारत हा जगातील सर्वात मोठा उपभोक्ता देश म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारची उत्पादने व सेवा आपल्या देशात विकल्या जातात. ...

भारत हा जगातील सर्वात मोठा उपभोक्ता देश म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारची उत्पादने व सेवा आपल्या देशात विकल्या जातात. या उत्पादनांवर व सेवांवर सरकारकडून वस्तू व सेवा कर वसूल केला जातो. हा कर ती वस्तू किंवा सेवा घेणाऱ्याला भरावा लागतो. त्यामुळे एखादी व्यक्ती प्रत्यक्षपणे इन्कम टॅक्स भरत नसली, तरी ती अप्रत्यक्ष कराच्या रुपाने सरकारच्या तिजोरीत भरच घालत असते, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.

आपण टॅक्स भरता का?

कामगार : महिनाकाठी आठ ते दहा हजार रुपयांची कमाई होते. त्यामुळे मी कर भरत नाही.

ऑटोचालक : घर कर व इतर कर भरले, परंतु, इन्कम टॅक्स आजपर्यंत भरला नाही.

भाजीपाला विक्रेता : इन्कम टॅक्स कधी भरला नाही, पण महापालिका व इतर कर मात्र नियमित भरतो.

फेरीवाला : दिवसभर मेहनत घेतल्यानंतरही पोट भरेल एवढीच कमाई होते, कर कुठून भरणार ?

सिक्युरिटी गार्ड : महिन्याच्या अखेरपर्यंत पगार पुरत नाही. कर भरण्याचा प्रश्नच येत नाही.

सफाई कामगार : कर भरण्याएवढी कमाई तर झाली पाहिजे, आजपर्यंत कधी कर भरलाच नाही.

सलून चालक : आर्थिक व्यवहार सुरळीत असावे म्हणून इन्कम टॅक्स भरावा लागतो.

लॉन्ड्री चालक : दुकानाचा कर व घराचा कर नियमित भरतो, प्राप्तिकर कधी भरला नाही.

घर काम करणाऱ्या महिला : कर कशाला म्हणतात हेच माहीत नाही.

प्रत्येकजण टॅक्स भरतो

उच्च उत्पन्न गट व नोकरदार वर्ग प्राप्तिकर भरतो. सामान्य जनता मात्र अप्रत्यक्ष कर भरतच असते. एखादी वस्तू खरेदी केली किंवा सेवेचा उपभोग घेतला, तर त्यावर असलेला जीएसटी ती वस्तू किंवा सेवा घेणाऱ्याच्या खिशातूनच वसूल केली जाते. ही अप्रत्यक्ष करवसुली आहे. पेट्रोल व डिझेलवरील करही अप्रत्यक्षपणे प्रत्येकाला भरावाच लागतो. देशातील प्रत्येक नागरिक सरकारच्या तिजोरीत भर घालतच असताे.

- डॉ. एकनाथ हेलगे, वाणिज्य व कॉमर्स ॲंड मॅनेजमेंट विभागप्रमुख, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा.