शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Sting Operation : प्रमाणीकरणानंतरही एफसीआयच्या भुई काट्यावरील ‘तूट’कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 15:28 IST

एकाच ट्रकच्या वजनात दोन काट्यावर तब्बल क्विंटलची तफावत

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या गोदामावरील भुईकाट्याच्या प्रमाणीकरणानंतर देखील वजनात तफावत आढळून येत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे गत दहा दिवसांपूर्वीच प्रमाणीकरण करण्यात आलेला ‘इलेक्ट्रानिक्स भुईकाटा’ संशयाच्या भोवºयात सापडला आहे.  गुरूवारी गोदामावर गत पाच दिवसांपासून उभे असलेल्या ट्रकचे गोदामावरील ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक  काट्यावर वजन केले. त्यावेळी संशय बळावल्याने ट्रक चालकांनी  शहरातील एका खासगी भुईकाट्यावर वजन करण्यात आले. त्यावेळी खासगी भुईकाट्यावर प्रत्येक ट्रकमागे ९०, ९५ ते एक क्ंिवटलपर्यंत वजन वाढल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.खामगाव (टेंभूर्णा) येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामावर धान्य मोजून देण्यासाठी  ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि.शी करार करण्यात आला आहे. दरम्यान, ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक च्या भुईकाट्यावरील वजनात तफावत आढळून येत असल्याच्या तक्रारीनंतर भारतीय वैद्यमापन शास्त्र विभागाकडून २९ एप्रिल रोजी तपासणी करण्यात आली. त्यावेळी काट्यात फेरफार आढळून आल्याने काटा जप्त करण्यात आला.  ब्लॅकस्टोन लॉजीस्टिक कंपनीने गुन्हा मान्य केल्यानंतर त्यांना २८ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. कंपनीने दंडाचा भरणा केल्यानंतर  १५ मे रोजी या वजन काट्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी अधिकारी तेथे धडकले. मात्र, काट्यावर वजनांचा अभाव असल्याने अखेरीस २१ मे रोजी या काट्याचे प्रमाणीकरण करण्यात आले. मात्र, प्रमाणीकरण करण्यात आल्यानंतर देखील एफसीआयच्या गोदामावरील ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि.च्या काट्यावरील वजनात तब्बल १ क्विंटलपर्यंत तफावत आढळून आली. त्यामुळे या काट्याच्या प्रमाणीकरणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, याप्रकाराबाबत भारतीय वैद्यमापन शास्त्र विभाग, भारतीय खाद्य निगम वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. भारतीय खाद्य निगमच्या एका बड्या अधिकाºयाने  या सर्वप्रकाराबाबत कानावर हात ठेवले.चौकट....असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!केंद्र शासन आणि एफसीआयच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे पाठविण्यात आलेल्या धान्याची गोदामावर पाचदिवसांपासून अडवणूक करण्यात येत असल्याची माहिती ‘लोकमत’ला प्राप्त झाली. या माहितीची शहनिशा करण्यासाठी ‘लोकमत’प्रतिनिधीने गोदामावर धडक दिली. त्यावेळी ट्रक चालकांनी आपबिती कथन केल्यानंतर काट्यावरील वजनाच्या फेरफारीबद्दल त्यांना ‘लोकमत’ प्रतिनिधी सांगितले. त्यावेळी गोदामावर उभ्या असलेल्या ट्रकचे सुरूवातीला ब्लॅक स्टोन लॉजीस्टिकच्या भुईकाट्यावर वजन केले. संशय बळावल्यानंतर ट्रक खाली न करताच दुसºया काट्यावर  एका खासगी काट्यावर ट्रकचे वजन केले असता, प्रत्येक ट्रकमागे सरासरी ९० किलो ते एक क्विंटलपर्यंत तफावत आढळून आली.चौकट...कोरोना संचारबंदी काळात धान्याची अफरातफर!एफसीआयच्या खामगाव(टेंभूर्णा) येथील भुईकाट्यावर वजनात फेरफार करून मोठा घोळ केल्या जात आहे. वैद्यमापन शास्त्र विभागानेही येथील पोलखोल उघडकीस आणली आहे. ऐन कोरोनासंचारबंदी काळात येणाºया धान्यांची मोठ्याप्रमाणात अफरातफर होत आहे. मात्र, याकडे राज्यातील एका बड्या राजकारण्याच्या वरदहस्तामुळे एफसीआय,  खामगाव येथील महसूल विभाग आणि भारतीय वैद्यमापन शास्त्र विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.
टॅग्स :khamgaonखामगाव