शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sting Operation : रस्ता खोदकामात निघणाऱ्या भंगाराची बेभाव विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 13:40 IST

खोदकामा दरम्यान, निघणाºया विविध वस्तू साहित्याची मातीमोल भावात विक्री करणारे एक रॅकेटच शहरात सक्रीय झाल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रस्ता खोदकामादरम्यान, बीएसएनल तसेच इतर कंपन्यांचे महागडे केबल,अ ॉप्टीक फायबर, पाणी पुरवठ्याची पाइपलाइन लोखंडी सुटे भाग आदी मोठ्याप्रमाणात काढण्यात आहेत. खोदकामा दरम्यान, निघणाºया विविध वस्तू साहित्याची मातीमोल भावात विक्री करणारे एक रॅकेटच शहरात सक्रीय झाल्याचे दिसून येते. मात्र, याकडे पोलिस आणि संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.शहरातून जाणाºया महामार्गाच्या विस्तारीकरणातंर्गत विकमसी चौक ते सुटाळा पर्यंत टप्प्याने खोदकाम करण्यात येत आहे. शहरातून जाणारा रस्ता एका बाजूने खोदण्यात येते. दरम्यान, रस्त्याच्या कडेला भारत संचार निगम लिमीटेडचे तांब्याचे केबल, आॅप्टीकल केबल तसेच इतर मोबाईल कंपन्यांची महागडी केबल आहे. पाणी पुरवठ्याची पाइपलाइनही या ठिकाणी असून, लोखंडी डक्ट इतर लोखंडी तसेच ताब्यांचे साहित्य खोदकामाच्या दरम्यान, बाहेर काढल्या जात आहे. खोदकामातील मलबा आणि या वस्तू डम्पींग ग्रांऊड तसेच इतर ठिकाणी टाकल्या जात आहे. यामध्ये असलेले भंगार साहित्य तसेच खोदकामा दरम्यान निघणारे साहित्यावर नजर ठेवून काही जण या साहित्याची मातीमोल भावात विक्री करीत आहे.असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!खोदकामातील मलबा घेवून जाणाºया ट्रकचा पाठलाग करण्यात आला. त्यावेळी मलबा टाकल्या जात असलेल्या ठिकाणी आधीच काही जण दुसºया एका टिप्परमध्ये आलेल्या मलब्यातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावत असल्याचे आढळले. खोदकामातील आणि मलब्यातील भंगार साहित्य टोळक्याने काही जण भंगाराच्या दुकानात विक्री करीत असल्याचेही ‘लोकमत’च्या पथकाला दिसून आले.

आॅप्टीकल केबलच्या पाईपची ४ रुपये किलोने विक्री!विविध मोबाईल कंपन्यांनी केबल सुरक्षीत रहावी यासाठी प्लास्टिक पाईप टाकले आहेत. खोदकामा दरम्यान, हे पाईप तुटत आहेत. या तुटलेल्या पाईपची चक्क ४ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

तांब्याच्या केबलची जाळून विक्री!मोबाईल कंपन्यांची महागडी वायरही भंगारात विकल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. खोदकामादरम्यान तुटलेली केबल, तांब्याचे तार आणि लोखंडी डक्ट चोरून भंगारात विकल्या जात आहे. तांब्याची केबल विकण्यापूर्वी तिच्यावरील प्लास्टिकचे आवरण जाळल्या जाते.

टॅग्स :khamgaonखामगावBSNLबीएसएनएल