शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र आईने चिमुकल्यास केले तप्त तव्यावर उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST

मोताळा: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याला सावत्र आईने तप्त तव्यावर उभे केल्याने हा चिमुकला जखमी झाला ...

मोताळा: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याला सावत्र आईने तप्त तव्यावर उभे केल्याने हा चिमुकला जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी पीडित मुलाच्या मामाने बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी सावत्र आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित चिमुकल्याचे मामा वैभव मनोहर मानकर (१९ रा. जयपूर लांडे, खामगाव) यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी तक्रार दिली आहे. त्यावरून बोराखेडी पोलिसांनी सायंकाळी गु्न्हा दाखल केला आहे. तक्रारीत नमूद केले आहे की, घरामध्ये खेळत असताना पीडित आठ वर्षाच्या मुलाचा लोखंडी आलमारीला धक्का लागल्याने ती आलमारी त्याच्या छोट्या बहिणीच्या अंगावर पडता पडता राहली होती. ती पीडित मुलाच्या सावत्र आईने रोखली होती. ही घटना १५ डिसेंबर २०२० रोजी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास घडली होती. त्यावेळी पीडित मुलास त्याची सावत्र आई शारदा सचिन शिंगोटे हीने गरम तव्यावर उभे केेले होते. त्यामुळे आठ वर्षाच्या मुलाचे तळपाय भाजून जखमा झाल्या होत्या. ही बाब पीडित मुलाने वैभवला सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान चिमुकला जखमी झाल्यानंतर त्याच्यावर प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेथून त्याला अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी वैभव मानकर यांच्या तक्रारीवरून पीडित मुलाची आई शारदा सचिन शिंगोटे यांच्या विरोधात विविध कलमांसह बाल न्याय अधिनियम २०१५ (मुलाची काळजी, संरक्षण आणि पुनर्वसन) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारी करीत आहेत.

बाल कल्याण समितीने नोंदवले बयाण

बुलडाणा येथील बाल कल्याण समितीनेही शुक्रवारी या मुलाचे बयाण नोंदविले असल्याची माहिती बाल कल्याण समितीच्या सदस्य ॲड. किरण राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. समितीने मुलाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्याचे बयाण नोंदविले आहे तर पोलिसांनीही प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने शुक्रवारीच बयाण नोंदवले होते. दरम्यान, या प्रकरणात आता मुलाचा मामा पुढे आला आहे. मुलाची आजी व त्याच्या मामाने मुलाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्यास अल्पवयीन मुलाला त्यांच्या ताब्यात समिती देऊ शकते, असेही ॲड. किरण राठोड यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र

सध्या या मुलावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, या पीडित मुलास त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात येऊ नये, असे पत्रच बालकल्याण समितीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांना दिले आहे. त्यामुळे सध्या हा मुलगा बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहे.