बुलडाणा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेऊन राज्याच्या सेवेत असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. वाहतुकीच्या क्षेत्रात होणार्या नव्या बदलांचे आव्हान पेलत आजही एसटी सर्वसामान्यांच्या पसंतीचे वाहन असल्यामुळे एसटीची दशा व दुर्दशा बदलविण्याची वेळ आली आहे. दररोज हजारो प्रवासी भारमान वाहणार्या एसटीला नवी उर्जितावास्था देताना नव्या शासनाने ह्यबुस्टर डोसह्ण देऊन प्रवाशांच्या सेवेत कायम ठेवण्याची अपेक्षा अधिवेशनाकडून होत आहे. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत आजही सर्वसामान्य प्रवाशांना एसटीचा प्रवास सुरक्षित वाटतो; मात्र या सुरक्षित प्रवासाच्या नावाखाली प्रवशांना अस्वच्छता, कमी वेग अशा समस्यांना सामोरे जावे लागते. एसटीला नव्या दमाची ताकत देताना नवीन गाड्या देण्याची गरज आहे. बुलडाण्याला गेल्या वर्षभरात केवळ ४ नवीन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील सात आगारांमध्ये भंगार अवस्थेत आलेल्या गाड्यांची संख्या मोठी असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. गेल्या आठवड्यात मेहकर आगारातील एका गाडीचे चाक निखळून पडले. ही एक घटना एसटीची स्थिती दर्शविणारी आहे. त्यामुळे एसटीला ह्यबुस्टर डोसह्ण देण्याची गरज व्यक्त होत आहे.
एसटीला हवा ‘बुस्टर डोस’
By admin | Updated: December 3, 2014 00:35 IST