बुलडाणा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची स्थिती, ह्यनाचता येईना, अंगण वाकडेह्ण अशी असल्याची टीका, राकॉंचे ज्येष्ठ नेते व उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे केली. पाचपुते यांना पक्षाने सर्व पदे दिली. अपक्ष आमदार असतानाही मंत्री पद दिले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. ही वस्तुस्थिती असताना आता ते पक्षात सन्मान होत नसल्याचे गार्हाणे गातात, हे हास्यास्पद आहे. मधुकरराव पिचड आणि पाचपुते यांच्यादरम्यान काय झाले, याची आपणास माहिती नाही; मात्र पिचड सतत ३५ वर्षांपासून निवडून येत आहेत. आमच्या पक्षातील एक आदिवासी समाजातील नेता एवढा लोकप्रिय असल्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. त्यामुळे सत्तेची पदे भोगल्यावर आता पाचपुते यांनी पक्षाला दोष देणे म्हणजे ह्यनाचता येईना, अंगण वाकडेह्ण असाच प्रकार आहे, असे अजित पवार म्हणाले.
‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी पाचपुतेंची स्थिती!
By admin | Updated: August 17, 2014 00:05 IST