शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जयस्तंभ चौकात उभारणार बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST

बुलडाणा : शहरातील संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळ्यानंतर जयस्तंभ चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

बुलडाणा : शहरातील संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळ्यानंतर जयस्तंभ चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती गठित करण्यात आली.

बुलडाणा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही असावा, यासाठी २३ डिसेंबर २०२० रोजी जिल्हा प्रशासन व आ. संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी जयस्तंभ चौकात असलेल्या व नंतर काढून टाकण्यात आलेल्या शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेवरच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा, यासाठी विविध संघटना व समाज बांधवांनी मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी आ. संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात समाजातील विविध मान्यवरांची बैठक होऊन या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती गठित करण्यात आली. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते जि.प.चे गटनेते ॲड. सुमित साहेबराव सरदार, तर कार्याध्यक्ष म्हणून जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती दिलीपराव जाधव यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष प्रा. दादाराव गायकवाड, दिलीप दौलत जाधव, अनिल आराख, सचिव म्हणून जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते अशोकराव इंगळे, सहसचिव ॲड. गणेश इंगळे, राहुल रामकृष्ण सुरडकर, कोषाध्यक्ष सिद्धार्थ आराख, संघटक प्रा. एस. पी. हिवाळे, सुमीत गायकवाड, सतीश पवार, सहसंघटक निरंजन जाधव, शाहिर डी.आर. इंगळे, कार्यकारिणी सदस्य म्हणून पुंजाजी मेंढे, सावजी जाधव, लक्ष्मण साळवे, संजय तोताराम जाधव, गजानन ससाने, दीपक मनवर, ॲड. अशोक गवई, अनिल किसन साळवे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून संजय जाधव, नितीन शिरसाठ यांची निवड करण्यात आली. या स्मारक समितीचे मार्गदर्शक म्हणून आ. संजय गायकवाड राहणार आहेत. नवनियुक्त कार्यकारिणीची लवकरच बैठक होऊन ही कार्यकारिणी आजीवन सदस्यांची निवड करणार आहे. लवकरच समितीचे सदस्य पुणे येथे जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पाहणी करून पुतळा निश्चित करणार आहेत.