शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचा नाबार्डसोबत सामंजस्य करार

By admin | Updated: March 18, 2015 01:40 IST

बुलडाणा जिल्हा बँक पुनरूज्जीवनाची प्रक्रिया; मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट.

बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला मदत देण्याबाबत केंद्र सरकारने ५ नोव्हेंबर रोजी केलेली घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य सरकारचा केंद्र सरकार तसेच नाबार्डसोबत करारनामा होणे अपेक्षित आहे. हा करारनामा २0 फेब्रुवारी रोजी होणार होता; मात्र विविध कारणांमुळे तो लांबला होता. अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिव्टरवर या सामंजस्य कराराबाबत स्वत: माहिती दिली असल्याने जिल्हा बँकेच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग खुला झाला आहे. अडचणीत आलेल्या बुलडाणा, वर्धा, नागपूर जिल्हा बँकांना मदत करण्याची घोषणा ५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी एमओयू म्हणजे (मेमॅरेन्डम ऑप अंडरस्डींग) अर्थात करारनामा होणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेच्या पुनरूज्जीवनासाठी केंद्र सरकारसोबतच नाबार्डची भूमिका मोठी असल्याने या राज्य सरकारकडून या करारनामासंदर्भात मंगळवारी हालचाली झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, आ. डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत नाबार्डसोबत करारनामा झाल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी टिव्टरवर दिली आहे. त्यांनी याबाबत नमूद केले आहे की, नागपूर, वर्धा व बुलडाणा या तिन्ही जिल्हा बँकेच्या संदर्भा तील सामंजस्य करार झाला असून, दोन लाख ५0 हजार शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यास या करारामुळे मदत होणार आहे. दरम्यान, पीएम घोषणेच्या अंमलबजावणीसाठीसुद्धा हा करार महत्त्वाचा ठरणार आहे; तसेच या करारामुळे जिल्हा बँकेच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेविरोधात नागपूर न्यायालयाच्या खंडपीठात सुरू असलेल्या खटल्यातही नाबार्डला न्यायालयात आपली भूमिका सादर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.