शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बस फेरी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घ्या बुलडाणा : कोरोना काळात आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घ्या

बुलडाणा : कोरोना काळात आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी कोविड कर्मचारी संघटनेच्या वतीने आ. नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली मदत

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बुलडाणा व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. १० जून रोजी ही मदत देण्यात आली आहे.

मलकापूर येथे शासकीय रक्तपेढी द्या

बुलडाणा : मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक ब्लड स्टाेरेज युनिट व शासकीय रक्तपेढीची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी जाणीव फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनात करण्यात आली आहे.

लर्निंग लायसन्स काढणाऱ्यांना मिळाला दिलासा

बुलडाणा : लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरी बसून ऑनलाईन परीक्षा देता येणार असून, लायसन्सची प्रिंट देखील ऑनलाईन काढता येणार आहे. आरटीओ विभागाने याबाबतचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे़

अतिवृष्टीग्रस्त ४८ शेतकरी मदतीपासून वंचित

साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा मंडळातील सवडद येथील ४८ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्याचा सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला हाेता ; परंतु अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही़

बिबी परिसरात हळद लागवडीस प्रारंभ

बिबी : वातावरणातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत असल्याने शेतकरी वेगळा प्रयाेग करीत आहेत. गत काही दिवसांपासून परिसरात जाेरदार पाऊस हाेत असल्याने चोरपांग्रा येथील शेतकऱ्यांनी हळद लागवड करायला सुरुवात केली आहे.

तलावांची पाहणी करण्याचे निर्देश

बुलडाणा : पावसाळ्यास प्रारंभ झाला असताना, जिल्ह्यातील पाझर तलाव, पाटबंधारे आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील तलावांची पाहणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी अनुषंगिक निर्देश देण्यात आले आहेत.

बुलडाण्यात स्वच्छता अभियान कागदावरच

बुलडाणा : स्वच्छता अभियान राबवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना लाखाेंचा निधी देण्यात येताे. मात्र, बुलडाणा शहरातील सार्वजनिक शाैचालयांची नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याचे चित्र आहे.

रुग्णवाहिका मिळाल्याने मिळाला दिलासा

सुलतानपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाेन नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रुग्णवाहिका अभावी रुग्णांना पुढील उपचारासाठी नेण्यासाठी कसरत करावी लागत हाेती़

नगर संवर्ग अधिकारी जिल्हाध्यक्षपदी इंगळे

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी अमाेल इंगळे यांची, तर सचिवपदी श्रीकांत काेल्हे यांची बहुमताने निवड करण्यात आली.