शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जलप्रतिज्ञा घेऊन जलजागृती सप्ताहाला सुरुवात

By admin | Updated: March 17, 2017 02:23 IST

२२ मार्चपयर्ंत जलजागृती सप्ताह; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

बुलडाणा, दि. १६- जलसंपदा विभागाच्यावतीने जिल्ह्यात १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन १६ मार्चला करण्यात आले. जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन व जलरथाचे पूजन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी सामूहिक जलप्रतिज्ञा घेतली.यावेळी कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग हेमंत सोळगे, जि.प सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कोंडावार, कार्यकारी अभियंता जिगाव उपसा सिंचन विभाग एस. व्ही.हजारे, सिंचन मित्रमंडळ नांदुराचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, पाणीवापर महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, पंचायत समिती सभापती तस्लीनाबी रसुलखा आदींसह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सामूहिक जलप्रतिज्ञा करण्यात आली. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. अधीक्षक अभियंता चौधरी यावेळी म्हणाले की, २२ मार्च या जागतिक जलजागृती जलदिनानिमित्त जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात १0 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन करुन हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. अधीक्षक अभियंता सुनील चौधरी यांनी जलजागृती सप्ताहांतर्गत राबविल्या जाणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले की, प्रकल्प लाभक्षेत्रातील प्रत्येक गावांत एक कार्यशाळा किंवा चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सिंचनाचे कायदे, नियम, पाणी वापर संस्थांची संपूर्ण माहिती, होणारे फायदे, सिंचनाचे प्रश्न, अपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाचे नियोजन, भूसंपादन, पूनर्वसन, उपसा सिंचन परवाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील खडकपूर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पूर्णा, ज्ञानगंगा, विश्‍वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपूजन यावेळी करण्यात आले. सप्ताहादरम्यान १९ मार्च रोजी वाटर रन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृव्त स्पर्धा आदी अनुषंगिक स्पर्धांंंचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचलन करून आभार चंद्रकांत साळुंके यांनी मानले. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.