शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चालक-वाहकांच्या मुक्कामासाठी एसटी करणार व्यवस्था

By admin | Updated: May 12, 2015 00:06 IST

एसटीने घेतला पुढाकार; ग्रामीण भागातील व्यवस्थेचे सर्वेक्षण.

खामगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागात मुक्कामी असणार्‍या बसमधील चालक-वाहकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. मु क्कामी राहणार्‍या ठिकाणी कर्मचार्‍यांना काय सुविधा आहे, याबाबत नुकतेच सर्वेक्षण सुरू केले असून, सुविधा नसणार्‍या ठिकाणी बसमध्येच झोपण्याची व्यवस्था करण्याचे धोरण अवलंबिले आहे. सद्य:स्थितीत राज्यात साडेसतरा हजारांच्या जवळपास एसटी बसेस धावत आहेत. सुमारे सव्वा लाख कर्मचारी महामंडळात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर पोहचण्याचे काम एसटीने केले आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात खासगी वाहनाच्या तुलनेत एसटी काहीशी मागे पडली तरीही ग्रामीण भागात आजही एसटीविना प्रवाशांना पर्याय नाही. १९९५ पर्यंत मुक्कामी असणार्‍या बसेसमध्ये चालक-वाहकासाठी झोपण्यासाठी सीटची व्यवस्था होती. तर मुक्कामी असणार्‍या गावात सरपंच, पोलीस पाटील कर्मचार्‍यांची व्यवस्था करतात. या कर्मचार्‍यांची निवासाची कुठलीच व्यवस्था नसल्याने त्यांना एसटीतच झोपावे लागते. उन्हाळा व पावसाळा मात्र चालक वाहकांना खूप त्रास सहन करावा लागतो. याबाबत कर्मचारी संघटनेच्यावतीने वेळोवेळी वरिष्ठांकडे निवासी सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली हो ती. अखेर चालक-वाहकांना मुक्कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था याबाबत वरिष्ठांकडून प्रत्येक आगार व्यवस्थापकांना माहिती मागविण्यात आली आहे. संबंधित आगारानेही मुक्कामी फेर्‍यांचे नियोजन करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. महामंडळाने चालक वाहकांच्या सोयीसाठी उचललेले पाऊल नक्कीच कर्मचार्‍यांची दखल घेणारे ठरेल.