शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST

जिल्हास्तरीय ऑनलाईन युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, रवींद्र धारपवार क्रीडा ...

जिल्हास्तरीय ऑनलाईन युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, रवींद्र धारपवार क्रीडा अधिकारी, रविकिरण टाकळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक प्रशांत खाचणे, प्रा.सुभाष मोरे, कैलास कोल्हे, टिळक क्षीरसागर, प्रा. किरण टाकळकर उपस्थित होते. शासनाच्या सूचनेनुसार बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. युवा महोत्सवामध्ये लोकगीत, तबला, मृदुंग,बासरी, हार्मोनियम, वक्तृत्व व शास्त्रीय गायनामध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अंतिम निकाल परीक्षकांनी सादर केल्यानुसार तबला या बाबीमध्ये शरद मधुकर चुकेवार याने, बासरी -ओंकार शरद कुळकर्णी, मृदुंग – अविनाश गजानन तळेकर, हार्मोनियम – चंद्रशेखर कैलास कोल्हे, वक्तृत्व अनुराधा गजानन सपकाळ, शास्त्रीय गायन – शरद मधुकर चुकेवार तसेच लोकगीत ज्ञानेश्वरी पोले, साक्ष अवचार, अंकिता अवचार, नम्रता लेंडे, कोमल काळे, योगीता थुटे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धकांची विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय युवा महोत्सवासाठी निवड झालेली आहे. विभागीय युवा महोत्सव सुध्दा ऑनलाईन पद्धतीने होणार असून, प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना लिंक प्राप्त झाल्यानंतर त्यांना सादरीकरण करावे लागेल.

ऑनलाईन युवा महोत्सवाला परीक्षक म्हणून टिळक क्षीरसागर, रविकिरण टाकळकर, प्रशांत खाचणे, कैलास कोल्हे, प्रा.सुभाष मोरे, प्रा. किरण टाकळकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संयोजक अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, रवींद्र धारपवार क्रीडा अधिकारी, विजय बोदडे वरिष्ठ लिपीक, किरण लहाने कनिष्ठ लिपीक, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे यांनी परिश्रम घेतले.