बुलडाणा : ग्रामीण भागातील जनतेच्या कोविड लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्यासोबतच लसीकरणापासून कुणीही वंचित राहू नये, या उदात्त हेतूने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचेवतीने २३ सप्टेंबर रोजी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये ९ हजार ३११ लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन होते. त्यापैकी तीन हजाराच्यावर लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले़
याबाबत तहसिलदार रूपेश खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय बैठकही घेण्यात आली हाेती़ यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, गटविकास अधिकारी सावळे, गट शिक्षणाधिकारी संजय पवार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि लसीकरण क्षेत्र संनियंत्रक दीपक महाले, कार्यक्रम सहायक सचिन हिवाळे आदी उपस्थित होते.
३३ पथकांनी नियुक्ती
२३ सप्टेंबर राेजी ३३ आराेग्य पथकांच्या माध्यमातून ५ प्राथमिक आराेग्य केंद्र आणि २५ गावांमध्ये विशेष शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते़ यामध्ये तीन हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस देण्यात आली