शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यात गौण खनिज चोरीविरुद्ध विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:56 IST

खामगाव: विना परवाना गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी  महसूल विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाने  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक  करताना वाहन आढळल्यास त्याच्यावर वाहनाच्या स्वरूपावरून दंडाची  वसुली केल्या जाणार असून, दंडाची रक्कमही १ ते ७ लाखापर्यंत असणार  आहे, अशी माहिती तहसीलदार सुनील पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देआता वाहनानुसार दंड वसुलीची तरतूद तहसीलदार पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विना परवाना गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी  महसूल विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाने  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक  करताना वाहन आढळल्यास त्याच्यावर वाहनाच्या स्वरूपावरून दंडाची  वसुली केल्या जाणार असून, दंडाची रक्कमही १ ते ७ लाखापर्यंत असणार  आहे, अशी माहिती तहसीलदार सुनील पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले  असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. प्रशासनाने या निर्णयाची ३  फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरू  केली आहे. नुकतेच जळगाव जिल्हय़ा तील वरणगाव येथून रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्‍या चार मोठय़ा  ट्रकांना पोलिसांनी पाठलाग करून खामगाव येथे पकडले. सदर वाहनांवर  खामगाव महसूल विभागाने नवीन तरतुदीनुसार दंड प्रस्तावित केला आहे.  तसेच मागील पाच दिवसात पकडलेल्या सहा वाहनांवरसुद्धा नवीन तर तुदीनुसार दंड आकारण्यात आला आहे. दंडाची रक्कम लाखात असल्याने काही वाहनधारकांनी त्यांची वाहने  सोडविण्यासाठी असर्मथता दर्शविल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच रेती  घाट धारकांकडून मिळणार्‍या रॉयल्टी पासवर आता तासाचा कालावधी नमूद  राहणार असून, एकाच रॉयल्टी पासवर होणार्‍या जादा अवैध वाहतुकीलाही  चाप बसणार आहे. 

अशी आहे वाहनानुसार दंडाची कारवाईनवीन दंडाच्या तरतुदीत ड्रिल मशीनकरिता २५ हजार, ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ  बॉडी ट्रॅक्टरसाठी १ लाख रुपये, फुल बॉडी ट्रक, टिप्पर २ लाख रुपये,  ड्रॉलर बार्ज, मोटररॉइज्ड बोट ५ लाख रुपये, एक्स कॅबेटर, मॅकेनाइज्ड  लोडर ७ लाख ५0 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

गौण खनिजाचे भाव वधारलेनवीन तरतुदीनुसार दंडाची रक्कम तसेच रॉयल्टी पासवर वेळेचा कालावधी  नमूद केल्याने गौण खनिज वाहतुकदारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे गौण  खनिज व्यवसायिकांनी गौण खनिजांचे भाव वाढवल्याचे समजते. अगोदर  दोन ते अडीच हजाराला १ ब्रास मिळणारी रेती आता चार ते साडेचार  हजाराला मिळत आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव