शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार हेक्टरवर सोयाबीन प्रात्याक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:03 IST

राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान: सोयाबीन उत्पादन वाढीसाठी होणार प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक प्रात्याक्षिक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात यावर्षी सुमारे ३ लाख ८५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल, असे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येकी १० हेक्टरनुसार, ५०० प्रात्याक्षिक ५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणार आहे.पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा व घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना खात्रेशीर मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबविले जात आहे. यातून राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान (सोयाबीन) पिकांची उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. या अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानाद्वारे प्रमाणित बी-बियाणे पुरवठा, एकात्मिक मूलद्रव्ये व्यवस्थापन तसेच या घटकाचा अंतर्भाव होता. ही योजनेची अंमलबजावणी खरीप पेरणी सुरु झाल्यानंतर कृषी विभागाकडून करण्यात येणार असून, यातून जिल्ह्यात सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे २०१७-१८ मध्ये या अभियानांतर्गत सोयाबीन पिकांचे एकूण ५ हजार हेक्टरवर ५०० प्रात्यक्षिक राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध बियाणे, इतर कृषी निविष्ठा, पीक संरक्षण उपकरणे, कृषी औजारे व कार्यक्षम पाणी उपस्याची साधणे घेण्याकरिता अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. यासाठी ८२९.७९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यंदा प्रात्याक्षिक क्षेत्र वाढले!राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यातील तेराही तालुक्यात यावर्षी क्षेत्रात वाढ होऊन ५ हजार हेक्टर करण्यात आले आहे. गतवर्षी २०१६-१७ मध्ये ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन प्रात्याक्षिक घेण्यात आले होते. यात प्रति प्रकल्प १०० हेक्टर क्षेत्रानुसार बुलडाणा तालुक्यात ३, मोताळामध्ये ४, मलकापूर ३, चिखली ५, खामगाव ४, नांदुरा ३, जळगाव जा.३, संग्रामपुर ३, शेगाव ३, मेहकर ४, लोणार ३, दे.राजा ३, सिं.राजा २ अशा एकूण ४३ प्रकल्पांचा समावेश होता.