शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या उत्पन्नात मजुरीही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:12 IST

संग्रामपूर: शेतकर्‍यांसाठी नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक  ओळखले जाते; मात्र यावर्षी सोयाबीन पिकाला पावसाचे वेळेवर  पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनला शेंगाच न लागल्यामुळे शे तकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर पिकाची सोंगणी केली. त्या  शेतकर्‍यांना प्रति एकरात फक्त १ क्विंटलच सोयाबीनचे उत्पादन  झाले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन पिकासाठी खर्च ५ हजार एका एकरातून उत्पादन १  हजार ५00 रूपये 

अमोल ठाकरे। लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: शेतकर्‍यांसाठी नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक  ओळखले जाते; मात्र यावर्षी सोयाबीन पिकाला पावसाचे वेळेवर  पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनला शेंगाच न लागल्यामुळे शे तकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर पिकाची सोंगणी केली. त्या  शेतकर्‍यांना प्रति एकरात फक्त १ क्विंटलच सोयाबीनचे उत्पादन  झाले आहे. तसेच या सोयाबीन पिकाला बाजारात कवडीमोल  भाव मिळत असल्यामुळे या सोयाबीन उत्पादनातून काढणीचा  खर्चही निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी चांगला पाऊस होईल,  असे समजले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या तुलनेत  यावर्षी संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाची  पेरणी मोठय़ा प्रमाणात केली होती. सन २0१७-१८ च्या खरीप  हंगामात शेतकर्‍यांनी १४ हजार ८५९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची  पेरणी केली. सुरुवातीला पावसाने ही साथ दिली; मात्र ऐन  दिवाळीच्या आधी ज्यावेळी सोयाबीन पिकाला पावसाची  आवश्यकता असते, ऐन त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात पावसाने  दांडी मारल्यामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला वेळेवर  पाऊस न बरसल्यामुळे ज्या प्रमाणात सोयाबीनला शेंगा लागायला  पाहिजे  होत्या. त्या प्रमाणात शेंगा लागल्या नाहीत, त्यामुळे शेतात  सोयाबीन होते; मात्र सोयाबीनच्या झाडाला शेंगाच नसल्यामुळे  काही ठिकाणी शेतकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर  फिरवला; मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनची काढणी केली, त्या  शेतकर्‍यांना फक्त एकरी सोयाबीनच्या पिकातून १ क्विंटल प्रति िक्वंटल उत्पादन झाले व या सोयाबीनला बाजारात फक्त १ हजार  ५00 ते २ हजार २00 रुपयापर्यंतच भाव मिळाले. एका एकरात सोयाबीन उत्पन्न १ हजार ५00 रुपये तर पेरणी पासून बियाणे, रासायनिक खत, फवारणी, डवरणी व काढणी  याचा खर्च ५ हजार रुपये त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनातून  काढणी खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वा तावरण निर्माण झाले आहे. वर्षभराचा खर्च मुलाचे शिक्षण,  दवाखाने, लग्न व घराचा कारभार कसा सांभाळावा, असा यक्ष प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने सोयाबीन  उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालु क्यातील शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे. 

पिकासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत लागणारा खर्चसोयाबीन बियाणे         १ बॅग प्रति एकर - १,५00 रुपयेरासायनिक खत - १000 रुपयेतणनाशक    - ८00 रुपयेफवारणी - ८00रुपयेडवरणी - ५00  रुपये काढणी खर्च - १,000 रु.एकूण खर्च - ५,१00 रुपये

एकरी सोयाबीन पिकातून एक क्विंटल उत्पादनही होत  नसल्यामुळे व काढणीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांना  सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागत आहे.- राजेंद्र ठाकरे, शेतकरी, वडगाव वाण

टॅग्स :agricultureशेती