शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगातील प्रदूषण रोखण्यासाठी सरसावले ‘सोयरे’!

By admin | Updated: September 14, 2016 01:01 IST

बुलडाणा येथील वन्य जीव सोयरे या संघटनेने पुढाकार घेतला आहे.

बुलडाणा, दि. १३: अजिंठय़ाच्या डोंगर रांगेत उगम पावलेल्या पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी वन्य जीव सोयरे या संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी नदीपात्राजवळील एका पुलाजवळ तात् पुरते निर्माल्य गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.जिल्हय़ातून जाणार्‍या पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या नावाने नावारूपास आलेल्या पैनगंगा अभयारण्यातील वन्य जीवांना या प्रदूषणाने होत असलेले धोके लक्षात घेऊन साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदीलगत असलेल्या पुलाजवळ निर्माल्य वस्तू एकत्र जमा करून नदीची प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी वन्य जीव सोयरे बुलडाणा यांच्यामार्फत पुलाजवळ तात्पुरते निर्माल्य कुंड १३ सप्टेंबर रोजी तयार करण्यात आले आहे. येत्या काळात गणपती विसर्जन, नवरात्रात देवीचे विसर्जन होणार आहे. विसर्जनाच्या वेळी आपले अनेक सोयरे हार, फूल, दूर्वा, प्रसाद, अगरबत्ती, बेलाची पाने, कर्दळीची पाने, नारळ, कापूर इ. विसर्जित करतात. या साहित्याच्या विसर्जनाने पैनगंगा नदीचे प्रदूषण वाढत आहे. या निर्माल्य वस्तू भाविकांनी वन्य जीव सोयर्‍यांनी तयार केलेल्या निर्माल्य कुंडामध्ये टाकून सहकार्य करावे, असे आवाहन वन्य जीव सोयरे यांनी केले आहे. घोषवाक्याद्वारे आवाहनभाऊ, दादा अन् काका पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखा, निर्माल्य येथेच टाका, असे घोषवाक्य तयार केले आहे. दरम्यान, वन्य जीव सोयर्‍यांच्या निर्माल्य कुंडाला माजी आ.विजयराज शिंदे यांनी अचानक भेट दिली व लोकांनी पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी वन्य जीव सोयर्‍यांनी तयार केलेल्या निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य टाकून सहकार्य करावे, असे आवाहन भक्तांना केले. यांनी घेतला पुढाकारवन्य जीव सोयरे निर्माल्य कुंड तयार करण्यासाठी गणेश ङ्म्रीवास्तव, गणेश झगरे, गणेश वानखेडे, प्रशांत आढे, सुरज वाडेकर, अमोल रिंढे, संजय मोटे, मनोज तायडे, मोरे, सुरेश दांडगे, संतोष कंकाळ, नितीन ङ्म्रीवास्तव या सोयर्‍यांनी ङ्म्रमदान करून निर्माल्य कुंड तयार केले.