लोकमत न्यूज नेटवर्कभालेगाव : मेहकर तालुक्यातील रायपूर शिवारातील सोयाबीन पिकाच्या शेगांवर करपा रोगाने आक्रमण केल्याने सोयाबीन पिकास धोका निर्माण झाला आहे. यावर्षी निसर्गाचे संपूर्ण चक्रच बदलले आहे. मध्यंतरी एक महिना पावसाने दडी मारली होती आणि आता या प्रकाराने शेतकरी चिंतातूर झाला आहे. कृषि विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असून, शेतकºयांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येत नाही. दिवसेंदिवस किडींचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मात्र, शेतकºयांना कोणत्या औषधाची फवारणी करावी, याबाबत माहिती मिळत नाही. परिणामी नुकसान वाढत आहे. यासंबंधी तत्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बबन महाराज वाडेकर यांनी तहसिलदारांकडे केली आहे. यासोबतच तात्काळ पंचनामा करण्याची मागणी शालीकराम काळे, मनोहर काळे, वसुदेव थुट्टे, प्रमेश्वर साबळे, गजानन काळे यांनी केली आहे.
सोयाबिनवर करपा रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:05 IST
भालेगाव : मेहकर तालुक्यातील रायपूर शिवारातील सोयाबीन पिकाच्या शेगांवर करपा रोगाने आक्रमण केल्याने सोयाबीन पिकास धोका निर्माण झाला आहे.
सोयाबिनवर करपा रोग
ठळक मुद्देकृषि विभागाचे दुर्लक्ष पिकांचे नुकसान