शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची आवक सात पटीने घटली!

By admin | Updated: October 30, 2014 23:32 IST

शेतमालाअभावी खामगाव बाजार समिती पडली ओस

नाना हिवराळे / खामगावयावर्षीच्या खरीप हंगामात निसर्ग शेतकर्‍यावर कोपला असून, पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणार्‍या उलाढालीवर झाला आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात अडीच लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक होती; मात्र यंदा केवळ ४0 हजार क्विंटलची आवक असल्याने सोयाबीनची आवक सात पटीने कमी झाल्याचे दिसून आले आहे. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरलेच नाही. ज्वारीसारख्या सोयाबीनचा दाणा राहिल्याने उत् पादनात प्रचंड घट झाली आहे. यावर्षी चांगल्या प्रतीच्या जमिनीत एक ते दोन पोते तर काहींना ४0 ते ५0 किलो उत् पादन होत आहे. यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी शेतातून सोयाबीन काढण्यासही उत्साह दाखविला नाही.खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान केवळ ४0 हजार क्विंटल सोयाबीन विक्रीला आणले आहे. सध्या २४५0 ते ३२५0 रुपये प्रतिक्विंटल भाव सुरु आहे. तर गतवर्षी याच कालावधीत अडीच लाख िक्वंटल सोयाबीनची आवक होती. गेल्या २१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान सहा दिवस बाजार समिती बंद असतानाही सात हजार क्विंटलपर्यंत सोयाबीनची आवक आली नाही. गत तीन दिवसांपासून पाच ते सहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. गतवर्षी याच दिवशी २0 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती व २३00 ते ३७२५ रुपये प्रति िक्वंटल भाव मिळाला होता; मात्र यावर्षी चित्र उलटे झाले आहे.