शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:35 IST

बुलडाणा : जिल्ह्यात सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच सोयाबीनवर ‘स्पोडोप्टेरा लिटुरा’ या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्पोडोप्टेराच्या विळख्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. जिल्ह्यात एकूण पिकाच्या ५0 टक्के क्षेत्रावर सोयाबीन आहे. 

ठळक मुद्देशेतकरी संकटात उत्पादन घटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच सोयाबीनवर ‘स्पोडोप्टेरा लिटुरा’ या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्पोडोप्टेराच्या विळख्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. जिल्ह्यात एकूण पिकाच्या ५0 टक्के क्षेत्रावर सोयाबीन आहे.  खरिपाच्या एकूण पिकापैकी सोयाबीन पीक हे सर्वाधिक असते. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाहच सोयाबीन पिकाच्या भरवशावर आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने सोयाबीनची पेरणी वेळेवर झाली. सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीन पीक चांगले बहरलेले असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत; परंतु सोयाबीनवर ‘स्पोडोप्टेरा लिटुरा’ या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीला शास्त्रीय भाषेत ‘स्पोडोप्टेरा लिटुरा’, असे म्हटले जाते. बहुजातीय पिकाचे नुकसान करणार्‍या या किडीचा सोयाबीन पिकावर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी प्रादुर्भाव जास्त आढळतो. मळकट पांढरट हिरवी व थोडीशी पारदर्शक दिसणारी ही कीड सध्या सोयाबीन पिकावर मोठय़ा प्रमाणावर दिसत आहे. या अळीच्या शरीरावर   पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असून, या अळीची मादी पतंग पानांवर पुंजक्यात ३00 ते ४00 अंडी घालते. ३ ते ४ दिवसांत अंड्यातून निघालेल्या या अळ्या सामूहिकपणे पानांचा हिरवा भाग खातात.     त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊन उत्पादनातही घट होते. 

शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरजजऊळका : परिसरातील सोयाबीनवर पाने खाणार्‍या अळीने व शेंड अळीने मोठय़ा प्रमाणात आक्रमण केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाने पिकाच्या पानावर स्पोडोप्टेरा व खोडामध्ये चक्रीभुंगा या अळीने शिरकाव केला. या अळीसाठी कोणती औषधे वापरावी, याचे ज्ञान शेतकर्‍यांना नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जऊळका या परिसरात सोयाबीनचा पेरा जास्त असल्याने शेतकरी वर्गाची भिस्त सोयाबीनवरच अवलंबून आहे. सोयाबीवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा याने केलेल्या आक्रमणामुळे शेतकरी कामलीचे अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाचा एकही कर्मचारी औषध फवारणीचे व इतर मार्गदर्शन करण्यासाठी आजपर्यंत गावात आलेला नाही. त्यामुळे जऊळका, पिंपळगाव कुंडा, लिंगा या ठिकाणी औषध फवारणीचे मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.