शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर हिलीओथीस अळीचे आक्रमण!

By admin | Updated: August 10, 2015 00:54 IST

बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, सल्ला घेऊच शेतक-यांनी उपाय करण्याचे अवाहन.

बुलडाणा : दोन दिवस झालेल्या संततधार पावसानंतर आता सोयाबीनवर हिलीओथीस अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही उंट अळी, लष्करी अळी असल्याची चर्चा शेतकर्‍यामध्ये सुरू आहे; मात्र शेतकर्‍यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. माहिती व मार्गदर्शन न घेता केलेल्या उपायांमुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. यावर्षी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनचा पेरा आहे; मात्र पेरणी झाल्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने उघाड दिल्याने अनेक ठिकाणच्या पेरण्या उलटल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील सोमवार, मंगळवार असे दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे उरलेल्या पिकांना जीवदान मिळाले. पावसाअभावी कशीबशी तग धरून असलेली सोयाबीनची झपाट्याने वाढ होत आहे; मात्र आता पुन्हा सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. सोयाबीनवर काही ठिकाणी हिलीओथीस अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बुलडाणा आणि मेहकर तालुक्यात अळीचा मारा अधिक असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ही अळी मारण्यासाठी शेतकर्‍यांनी फवारणी सुरू केली आहे. मात्र नेमकी अळी कोणती आहे, त्यासाठी फवारणी करताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. त्यासाठी कृषितज्ज्ञांचे शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरज आहे. यासंदर्भात कृषी विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क केला असता, सोयाबीनवर नेमकी कोणती अळी पडली, याची माहिती घेणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा उंट अळीचा प्रादुर्भाव नाही, असेही सांगण्यात आले आहे.