शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: June 26, 2015 01:35 IST

बुलडाणा जिल्ह्यात ४६ टक्के पेरणी; आठ दिवसांत पेरणीची टक्केवारी वाढली.

बुलडाणा : जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे संपवून पेरणीचे नियोजन केले आहे. काही तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर गत आठ दिवसांत जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी वाढली. जिल्ह्यात खरीप पेरणीच्या एकूण ७.४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ४६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यात सोयाबीनची सर्वाधिक १ लाख ९२ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली. कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण पेरणी क्षेत्रापैकी १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात ९८ टक्के खरिपाची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने दर्शविली आहे; मात्र १ ते १७ जूनपर्यंत सर्व १३ तालुक्यांमध्ये पडलेला सरासरी पाऊस ६८.१ टक्के एवढाच होता. त्यामुळे केवळ ५५ हजार ३0५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी सात एवढी नोंदविली गेली; मात्र कापूस व सोयाबीन ही पिके वगळता इतर पिकांच्या पेरणी क्षेत्रात अद्यापही वाढ झाली नाही. गत काही दिवसांत जिल्ह्यातील बर्‍याच तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात आजपर्यंत १४८३.७0 मिलिमीटर एवढा नोंदविला गेला असून, त्यांची सरासरी ११४.१३ टक्के एवढी आहे. आठवड्याभरात तेराही तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतकर्‍यांनी पेरणीचा मुहूर्त साधला. सोयाबीन आणि कापूस यांच्यासाठी हा पुरेसा पाऊस असल्यामुळे या पिकांचे पेरणीक्षेत्र वाढले आहे; मात्र ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, भुईमूग, मूग, तीळ, सूर्यफूल, ऊस या पिकांच्या पेरणीचे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.

*सोयाबीनची ९२ टक्के पेरणी पूर्ण

        जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये यावर्षी सोयाबीन पेरणीसाठी २ लाख १८ हजार ३00 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ९२ टक्के पेरणीचे उद्दिष्ट शेतकर्‍यांनी गाठले असून, २५ जूनपर्यंत १ लाख ९२ हजार २0२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. २ लाख ४४ हजार ४00 हेक्टरवर कापसाचे नियोजन असताना ९१ हजार ९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. म्हणजे ३७ टक्के पेरणीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.