शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

पेरण्या खोळंबल्या!

By admin | Updated: June 20, 2017 04:37 IST

घाटाखालील तालुक्यांमध्ये १00 मिमीपेक्षाही कमी पाऊस.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात घाटावर दमदार पाऊस होत असताना घाटाखालील शेगाव, मलकापूर, संग्रामपूर, खामगाव व जळगाव जामोद तालुक्यात दमदार तसेच दोन ते तीन दिवसांआड आवश्यक असणार्‍या पावसाअभावी अध्र्यापेक्षा जास्त पेरण्या रखडल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले होते. त्यानंतर जूनच्या दुसर्‍या आठवड्यात मान्सूनचा पाऊसदेखील जिल्ह्यात सर्वत्र बरसला. जिल्ह्यातील घाटावर दमदार पाऊस बरसला असताना, घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर या तालुक्यात १00 मिमीच्या आसपासच पाऊस बरसला आहे. अधूनमधून पाऊस होत असतानाही पेरणीयोग्य दमदार पाऊस झाला नाही. यामुळे दुबार पेरणीचे संकट पाहता या तालुक्यातील अध्र्याहून अधिक शेतकर्‍यांनी पेरण्या थांबविल्या आहेत. आतापर्यंंत या पावसाची या तालुक्यातील आकडेवारी पाहिली असता शेगाव तालुक्यात ७0 मिमी, मलकापूर ८0 मिमी, संग्रामपूर ८६ मिमी, खामगाव १0७ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. १00 मिमीच्या आसपास पाऊस झाला असला, तरी पावसातील खंडामुळे जमिनीतील ओल सुकत आहे. पेरणीनंतर पाऊस येईल की नाही, यामुळे ह्यदुधाने तोंड पोळले ताकही फुंकून प्याह्ण याप्रमाणे दुबार पेरणीचे संकट पाहता शेतकरी पेरणी करण्याच्या मानसिकतेत नाही. ज्या शेतकर्‍यांकडे विहीर, नदी-नाल्यांचे पात्रातील पाणी अशी सिंचनाची व्यवस्था आहे, अशाच शेतकर्‍यांनी पेरणी उरकली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रफळावरील पेरणी अद्याप बाकी आहे. या तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी १00 मिमीचे जवळपास असली, तरी यापैकी काही महसूल मंडळात १00 पेक्षा जास्त, तर काही महसूल मंडळात आकडेवारीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. ज्या महसूल मंडळात जास्त पाऊस झाला, अशा शिवारातील पेरण्या उरकल्या आहेत. मात्र, पेरण्या झालेले क्षेत्रफळ नगण्य असून, अद्याप ५0 टक्केचे वर पेरण्या रखडल्या आहेत.