शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 15:30 IST

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

- अजहर अली लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.गत दहा ते बारा दिवसापासून वरून राजा रुसून बसल्याने हजारो हेक्टरवरील पेरण्या करपण्याची दाट शक्यता आहे. सद्यास्थिती पेरणी झालेली पिके उगवली असुन तापमाणात वाढ झाल्याने सोपटत आहेत. पिकांना पाणि न मिळाल्यास उगवलेली पिके करपतील या मुळे येथिल शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गंभिर स्वरूपाच्या दुष्काळाने आर्थिक संकटात सापडलेल्या दुष्काळ ग्रस्त शेतकय्रांसाठी पावसाने दडी मारल्याने दुष्काळात तेरावा महीना उगवला. संग्रामपूर तालुक्यातील ४४ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावर दर वर्षी खरीप पिकींची लागवड करण्यात येते.सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले दुथळी भरून वाहु लागले. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यावर्षी पावसाळा चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले होते.शेतकºयांनी शेतीत विविध पिकांची लागवड केली. तालुक्यात एकुण ३६ हजार ४६० हेक्टरवरील क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये ३११ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली. मका ८८२ हेक्टर, तुर १ हजार ६५९ हेक्टर, मुग ६८३ हेक्टर, उडीद ५५९ हेक्टर, सोयाबिन ११ हजार ७३०, तर कपाशी पिकाची २० हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असुन सर्व पिके पाण्याअभावी धोक्यात आली असल्याचे विदारक चित्र आहे. गत पाच वर्षापासून संग्रामपुर तालुक्यात निर्सगाच्या लहरीपणामुळे शेती पिकांचे मोठ्यीप्रमाणात नुकसान होत असल्याने शेती घाट्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थीक कोंडी झालेली दिसून येते. खरिप हंगामात बँकांनी पिक कर्ज व कर्जाचे पुर्नगठन करण्यास नकार घंटा दिल्याने शेतकºयांनी सावकारांचे उंबरठे झिजवत कर्ज काढुन हंगामी पिकांची पेरणी केली.परंतु पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात पावसाचे लवकर आगमन न झाल्यास हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे बळीराजा व्यथीत झाला आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी