शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या वादातून भावाचा खून

By admin | Updated: June 25, 2017 09:19 IST

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; चार आरोपी ताब्यात.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: पेरणीचा वाद विकोपाला जाऊन सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची थरारक घटना २४ जून रोजी तालुक्यातील मेहुणा शिवारात घडली. सदर प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील टाकरखेड भागीले येथील डोंगरे कुटुंबाची शेती मेहुणाराजा शिवारात आहे. आज सकाळी कांतीलाल डोंगरे पत्नी व मुलासह शेतात तुरीचा पेरा करीत असताना त्यांचा लहान भाऊ गुलाब डोंगरे त्याची पत्नी मुलगा तेथे आले. यावेळी पेरणीचा वाद विकोपाला गेला व गुलाब डोंगरे, सुनील डोंगरे यांनी कांतीलाल डोंगरेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले सदर मारहाणीत कांतीलाल गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, मृतकाची पत्नी पार्वता कांतीलाल डोंगरे यांच्या फिर्यादीवरून गुलाब रामचंद्र डोंगरे, सुनील गुलाब डोंगरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला तर फिर्यादी व तिच्या मुलास लाठीकाठीने मारहाण केल्याप्रकरणी अमोल गुलाब डोंगरे, कमलबाई गुलाब डोंगरे व दुर्गाबाई रामचंद्र डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, ठाणेदार सारंग नवलकार, सहायक पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मुख्य आरोपी गुलाब डोंगरेसह चौघांना ताब्यात घेतले आहे.