शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी मांडल्या व्यथा

By admin | Updated: May 26, 2015 02:13 IST

लोणार येथे आम आदमी पक्षाची शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा.

लोणार : गारपीट, अतवृष्टी व सततच्या नापिकीला कंटाळून विदर्भातील शेतकर्‍यांनी पत्कारलेला आत्महत्येचा मार्ग सोडण्यासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांंंनी २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक बसस्थानक परिसरात शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रेदरम्यान शेकडो शेतकर्‍यांशी संवाद साधला. आपच्या शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रेचे २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता तालुक्यात आगमन झाले होते. दरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांंंनी गारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसल्याने प्रचंड नुकसान झालेल्या वडगावतेजन, शारा, सुलतानपूर, किन्ही, बिबखेड, धायफळ, किनगावजट्ट येथील शेतकर्‍यांशी संवाद साधून शेतकर्‍यांची परिस्थिती जाणून घेतली. सायंकाळी ६ वाजता दरम्यान १0 ते १२ वाहनांच्या ताफ्यासह आपची शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा लोणार शहरात दाखल झाली. त्यानंतर स्थानिक बसस्थानक परिसरात दीड तास शहरातील शेकडो शेतकर्‍यांशी संवाद साधून आत्महत्या न करण्याचे आवाहन डॉ.प्रतिमा व्यवहारे, सुनील मोरे, प्रशांत मोरे, शाहिना पठाण यांनी केले. याप्रसंगी शेतकर्‍यांनी आपच्या कार्यकर्त्यासमोर आपल्या व्यथा मांडतांना सांगितले की, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. पेरणीसाठी पीक कर्जाचे पुनर्गठण होत नाही. शेतीला पाणी, वीज मुबलक प्रमाणात मिळत नाही, शेती व्यवसाय तोट्यात गेल्याने दोन वर्षांपासून पिकांचे उत्पादन झाले नाही. लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. शासनाने संपूर्ण कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला असल्याने शेतकर्‍यांनी कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्कारला आहे.