शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या सोडवा!

By admin | Updated: July 17, 2017 02:05 IST

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शिक्षण हा राज्याच्या व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण पद्धतीवर देशाचे अथवा राज्याचे उज्ज्वल भविष्य अवलंबून असते. या पद्धतीचा शिक्षक हा कणा आहे. त्यामुळे कणा मजबूत असणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना ज्ञानदानाचे कार्य करणे सहज करावे, असे आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षकांच्या समस्या सोडविताना राज्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, शिक्षण उपसंचालक राठोड, माजी आमदार धृपतराव सावळे, सभापती श्वेता महाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख, शिवचंद्र तायडे आदी उपस्थित होते. शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याच्या सूचना करीत राज्यमंत्री पाटील म्हणाले, पगारासाठी शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागू नये. तसेच एमसीव्हीसी कनिष्ठ, माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी. या वेतनश्रेणीस पात्र असलेल्या शिक्षकांना त्वरित वेतनश्रेणी द्यावी. त्याचप्रमाणे शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक विहित कालावधीत अदा करावे. या देयकांसाठी विहित कालावधीत अंमलबजावणी कार्यक्रम ठरवावा. याप्रसंगी शिक्षकांनी विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये चटोपाध्याय प्रलंबित प्रकरणे, अंशदायी निवृत्तीवेतन योजना बंद करून जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे, अंशदायी निवृत्तीवेतन योजनेत कपात झालेल्या निधीबाबत पावत्या देणे आदी प्रश्नांचा समावेश होता. सर्व प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासन देत काही प्रश्न जागेवरच ना. पाटील यांनी सोडविले. या सभेचे संचालन अंजली नेटके यांनी केले. सभेला उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या विचार सभेला जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. काही शिक्षकांनी निवेदने देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.