शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित समस्या सोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानासह इतर प्रलंबित मागण्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानासह इतर प्रलंबित मागण्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट राज्य ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी २३ डिसेंबर रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त, नियोजन मंत्री ना.अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांची मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील ग्रंथालय चळवळीतील अडचणी आणि समस्यांबाबत निवेदन दिले व सखोल चर्चा केली. राज्यातील ग्रंथालयाच्या अनुदानाच्या बाबतीत होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रंथालयातील कर्मचारी बांधवांना आर्थिक अडचणीबाबतीत मंत्री महोदयांना अवगत करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री ना.पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.सामंत यांनी लवकरात लवकर हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन ग्रंथालयांच्या पदाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रामेश्वर पवार, प्रमुख कार्यवाह डॉ.गजानन कोटेवार, जिल्हा ग्रंथालय संघ पुणे कार्याध्यक्ष सोपानराव पवार, बुलडाणा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ नियामक मंडळ सदस्य सुनील वायाळ यांची उपस्थिती होती.