पिंपळगाव सैलानी : चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथे १५ ऑगस्ट रोजी रायपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी ५ हजार रुपयाची अवैध देशी दारू पकडली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली. याबाबत गोपनिय माहिती मिळाल्याने ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बबन रामपूरे, बद्री कायंदे, मोहन राठोड यांनी आरोपी भिका तुकाराम तोडे, अर्जून शेनफड गोफणे यांच्या घरी धाड टाकून देशी दारुचे ११0 शिश्या व दोन स्टीलचे हंडे जप्त केले व त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार ६५ ड चा गुन्हा दाखल करुन या दोन आरोपींना अटक करण्यात आली.
सोनेवाडीत दारू जप्त
By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST