शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

११वीच्या अभ्यासक्रमात बुलडाण्याचा मातीचा गंध!

By admin | Updated: June 12, 2016 02:48 IST

११ वीच्या अभ्यासक्रमात सदानंद देशमुख, अजीम नवाज राही यांच्या कवितांचा समावेश.

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता ११ वीच्या नवीन पाठय़पुस्तकात प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांच्या 'सोनं होऊन जगावं' आणि अजीम नवाज राही यांच्या 'झाडे सडकेलगत उगवलेली'या कवितांचा समावेश केला गेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावीचे मराठी भाषेचे पुनर्रचीत पाठय़पुस्तक तयार करताना विद्यार्थ्यांंचा सर्वांंगीण विकासावर भर दिला. यासाठी अभिजात साहित्याची ओळख, शाश्‍वत मूल्यांची जोपासना, उत्तम नागरिकत्वाची शिकवण व पर्यावरणाशी मैत्री ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पाठय़पुस्तकात स्थानिक ते जागतिक घडामोडींचा उहापोह केला असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि भाषा या त्रिसूत्रींची सांगड घातली आहे. शेतकर्‍यांच्या भकास जीवनात आशावादाची पेरणी करणारी बारोमास कादंबरी प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांच्या वास्तवदग्ध, सकस लेखणीतून अवतरली. मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार या कादंबरीच्या पदरात येवून पडला. विद्यापीठस्तरावर तहान, बारोमास या कादंबर्‍यांचा अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.सोबतच अजीम नवाज राही यांच्या व्यवहाराचा काळा घोडावर राज्य आणि देशपातळीवरच्या मातब्बर पुरस्कारांचा अक्षरश: वर्षाव झाला. त्यात अमेरिकेतील फाऊंडेशन आणि भारतातील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबईचा वाड्मयीन क्षेत्रातला अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय लेखनाचा कवी केशवसूत पुरस्कार यांचा विशेष समावेश होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १0 च्या अभ्यासक्रमात त्यांच्या ह्यपडझड मोहोल्ल्याचीह्ण या कवितेचा समावेश केला. सध्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठ अमरावती, गोंडवाणा गडचिरोली विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्राच्या अशा पाच विद्यापीठात अजीम नवाज राही यांच्या कवितांचा विद्यापीठ स्तरावर समावेश झाला. कविता आणि निवेदन महाराष्ट्राच्या या दोन क्षेत्रात स्वत:च्या नावाचा ठसा उमटविणारे अजीम नवाज राही आणि त्यांचा शब्दप्रवास बुलडाणा जिल्ह्यासाठी भूषणावह ठरला. इयत्ता ११ वीच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल अजीम नवाज राही आणि प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांच्यावर वाड्मयीन क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.