खामगाव : हमीदराने तूर खरेदी केंद्रावर १५ एप्रिलपासून आवक बंद करण्यात आली आहे. मात्र वाढलेल्या आवकमुळे बारदान्याची टंचाई या केंद्रांवर निर्माण होत आहे. परिणामी मोजमाप मंदावले असून ऐन लग्नसराईतही शेतकऱ्यांना या केंद्रांवर मुक्काम वाढत आहे. जिल्ह्यात यावर्षी १३ ठिकाणी ५ हजार ५० रुपये प्रतिक्ंिवटल या दराने तूर खरेदी करण्यात येत आहे. मात्र मागीलवर्षी तीन आकडी भाव असणाऱ्या तुरीला यावर्षी निम्मा सुध्दा भाव नाही. शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने गतवर्षी ज्या शेतमालाचे भाव वाढतात त्या पिकाचे उत्पादन शेतकरी भाववाढीच्या आशेने घेतात. मात्र आयात व इतर कारणांमुळे अशा शेतमालाचे भाव पडतात. अशीच शेतकऱ्यांची निराशा यावर्षी तुरीच्या पिकाने केली आहे. परिणामी कधी नव्हे तेव्हढी आवक हमीदर तूर विक्री केंद्रावर झाली आहे. परिमाणी अनेक शेतकरी महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून हमीदर केंद्रावर मुक्काम ठोकून आहेत.
तुरीचे मोजमापाला संथगती
By admin | Updated: April 20, 2017 15:59 IST