शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शेगावच्या सौंदर्यात भर घालणारा स्काय वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:41 IST

शेगाव : शेगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि भाविकांच्या सुविधेकरिता महत्त्वपूर्ण आणि उपयोगी स्कॉय वॉक लवकरच भक्तांच्या सेवेत आपल्याला पहावयास मिळणार आहे.

विजय मिश्रा। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि भाविकांच्या सुविधेकरिता महत्त्वपूर्ण आणि उपयोगी स्कॉय वॉक लवकरच भक्तांच्या सेवेत आपल्याला पहावयास मिळणार आहे.आनंदसागर विसावा ते गजानन महाराज मंदिर अशा शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या उनाड नाल्यावर १२०० मीटर लांबीचा स्कॉय वॉक जलदगतीने उभारल्या जात आहे. याच नाल्यावर श्री गजानन महाराज संस्थानला लागून असलेल्या उनाड नाल्यावर काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या मंजुरीप्रमाणे गजानन महाराज संस्थानकडून अगोदरच भव्य दर्शनबारी निर्माण करण्यात आली आहे. आता शेगाव विकास आराखड्यामध्ये शासनाने समाविष्ट केल्याप्रमाणे आनंदसागर विसावा भक्तनिवास आणि आनंद विहारमध्ये थांबणाऱ्या हजारो भक्तांना कुठल्याही रहदारीच्या अडथळ्याशिवाय पायदळ दर्शनमार्ग म्हणून या स्कॉय वॉकचा वापर करता येणार आहे. या स्कॉय वॉकची लांबी १२०० मीटर असून, २५ कोटी रुपये निधीची तरतूद आहे. या स्कॉय वॉकचे काम आर.ई.इन्फ्रा. मुंबई करीत असून, अवाढव्य अशा पायलीग मशीनद्वारे स्कॉय वॉकच्या पिल्लर उभारणीचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. पिल्लर उभारणी जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली असून, येणाऱ्या दिवाळीला स्कॉय वॉक पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या स्कॉय वॉकला एलईडी लाईट व्यवस्था, तीन ठिकाणी प्रसाधनगृह तर एक कॅन्टीनची उभारणी यावर करण्यात येणार आहे. हा स्कॉय वॉक शहरातील मध्यवस्तीमधून जाणारा असल्याने येणाऱ्या काळात शेगाव शहराच्या सौंदर्यात या स्काय वॉकमुळे निश्चितच भर पडणार असून, शहरातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने मोलाचा ठरणार एवढे मात्र खरे.