गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे राजकुमार बडोले यांचे आश्वासनबुलडाणा : रूईखेड मायंबा येथील पिडीत महिलेला एक लाख रूपयांची मदत दिलीअसून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात केली. रूईखेड मायंबा येथील एका महिलेला गावातीलच काही नागरिकांनी मारहाण करूनधिंड काढली होती. याप्रकरणी चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलनकरीत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेतसामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पिडीत महिलेची शनिवारी सकाळीजिल्हा सामान्य रूग्णालयात भेट घेतली. यावेळी महिलेनी तिला झालेल्यामारहाणीची माहिती दिली. गावातीलच काही नागरिकांनी मारहाण केली असून,आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे सदर महिलेने बडोले यांनासांगितले. त्यांनी पिडीतेला ॲट्रासिटी कायद्यातंर्गत विविध कलमान्वयेदाखल गुन्ह्याप्रमाणे प्राथमिक मदतीचा एक लक्ष रूपयांचा धनादेश दिला.यावेळी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार कडक कारवाईकरण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री यांनी दिल्या. तिक्रिया देतानासामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले, ही घटना दुर्देवी असूनअशाप्रकारच्या घटना घडणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. जिल्हाप्रशासनाने अशा घटनांवर वचक निर्माण करण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाईकरावी. तसेच समाजानेही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांकडे दुर्लक्षकरून जातीय सलोखा अबाधीत ठेवावा. याप्रकरणी शासन सर्वतोपरी मदत पिडीतकुटूंबाला करेल. याप्रसंगी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थुल, जि. पअध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराजशिंदे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षकशशीकुमार मीना, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक वडपुते,प्र. सहाय्यक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोजमेरत,अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.
पिडीत महिलेला सहा लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 13:52 IST