शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२४० कलावंतांना सहा महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:01 IST

गत चार वर्षांमधील निवड झालेल्या एकूण २४० कलावंतांचे मानधन गत सहा महिन्यांपासून अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात सहा महिन्यांपुर्वी नव्याने निवड झालेल्या २४० कलावंताना अद्यापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.शासनाच्या वृध्द साहित्यिक कलाकार मानधन योजनेअंतर्गत गत चार वर्षांमधील निवड झालेल्या एकूण २४० कलावंतांचे मानधन गत सहा महिन्यांपासून अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे मानधान तत्काळ जमा करून वृध्द कलावंतांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील वृध्द साहित्यिक कलावंतांना शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत तुटपुंजे मानधन देण्यात येत आहे, असा आरोपही वृध्द कलावंत करीत आहेत. गत सन २०१५ -१६ ते २०१८-१९ या चार वर्षांतील प्रत्येकी ६० अशा एकूण २४० पात्र कलावंतांची निवड सहा महिन्यांपूर्वी निवड समितीच्या माध्यमातून करण्यात आली. त्यात अ वर्ग कलावंत १४, ब वर्ग कलावंतर ६० व क वर्ग कलावंत १६६ अशा २४० कलावंतांची निवड करण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यातील २४० पात्र कलावंतांची निवड होऊन सहा महिने उलटून गेले, तरीही अद्यापपर्यंत कलावंतांना त्यांचे मानधन मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभरातील कलावंतांची फरपट सध्या हाते आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगाव