शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्यूच्या तापामुळे मृत्यू! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:45 IST

बुलडाणा : शहरापासून अगदी जवळ असलेल्या कोलवड येथे  एका सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्युच्या आजारामुळे मृत्यू झाला  आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  पसरले आहे. बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर  कारवाई करून गावात साफसफाई अभियान राबविण्यात यावे,  अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देगावात साफसफाई करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरापासून अगदी जवळ असलेल्या कोलवड येथे  एका सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्युच्या आजारामुळे मृत्यू झाला  आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  पसरले आहे. बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर  कारवाई करून गावात साफसफाई अभियान राबविण्यात यावे,  अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. कोलवड येथील अर्णव सागर जाधव या सहा महिन्याच्या  बालकास ताप येत असल्याने त्याला २३ सप्टेंबर रोजी येथील  डॉ.जाधव यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती  करण्यात आले होते; परंतु त्याचा ताप उतरत नसल्याने  डॉ.जाधव यांनी चेकअप करून त्याला डेंग्यूचा ताप असल्याची  शक्यता वर्तविली. त्यामुळे २६ सप्टेंबर रोजी अर्णवला तातडीने  औरंगाबाद येथील अमृत बाल रुग्णालयात दाखल करण्यात  आले. तेथील डॉक्टरांनी त्याच्या विविध तपासण्या करून त्याला  डेंग्यू असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात  आले; परंतु २९ सप्टेंबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाला. मागील काही दिवसांपासून गावात मोठय़ा प्रमाणावर  डासांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य कर्मचार्‍यांचे गावाकडे लक्ष  नाही. पावसाळ्यात साचलेल्या गटारामध्ये गप्पी मासे सोडण्यात  आले नाही. आरोग्य कर्मचारी एका तासासाठी गावात येऊन  पसार होतात. त्यामुळे एका सहा महिन्याच्या बालकाला जीव  गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून गावात साफसफाई करण्यात  यावी, अशी मागणी शंकर जाधव, प्रकाश जाधव, संजय  जाधव, विनोद जाधव, नाजुकराव जाधव, भुजंगराव जाधव,  गुलाबराव जाधव, ओंकार जाधव, शेषराव हिवाळे, राजू  जाधव, प्रकाश जाधव, सागर जाधव, भानुराव जाधव, गजानन  जाधव, संदीप जाधव, बाबूराव जाधव, प्रभाकर वैद्य, योगेश  जाधव, नितीन सपकाळ, अनंता वैद्य या ग्रामस्थांनी केली आहे.