शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आम्हाला मोफत धान्य का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:14 IST

‘साहेब आम्हाला मोफत धान्य का नाही’?, असा प्रश्न गोरगरीबांकडून वारंवार विचारल्या जात आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाउनमध्ये गोरगरीबांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांना तांदूळ, डाळी मोफत वाटप करण्याचे आदेश आहेत. परंतू काही ठिकाणी धान्य वाटपात गोंधळ निर्माण होत आहे. आतापर्यंत मोफत डाळ लाभार्थ्यांना मिळाली नाही. काही शेतकऱ्यांची नावे पुरवठा विभागाच्या यादीत नसल्याने, त्यांनाही धान्यापासून वंचीत रहावे लागते. त्यामुळे ‘साहेब आम्हाला मोफत धान्य का नाही’?, असा प्रश्न गोरगरीबांकडून वारंवार विचारल्या जात आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे हातमजूरीवर उदरनिर्वाह असलेल्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. लॉकडाउनच्या काळात गोरगरीब नागरिक अन्नधान्यापासून वंचीत राहू नये, यासाठी पुरवठा विभागाकडून मोफत धान्य पुरविण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्तिस पाच किलो मोफत तांदुळ महिन्याला दिल्या जातो. जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ३७७ शिधापत्रिकाधारक मोफत धान्याचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांकडे देण्यात आली आहे. त्या यादीमध्ये शिधापत्रिका असलेल्या काही नागरिकांची नावेच नाहीत. एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना मोफत धान्याचा लाभ मिळत नाही. जिल्ह्यात अशा केशरी शिधापत्रिका धारकांची संख्या ९२ हजार १४२ आहे. त्यामुळे धान्य वितरणावेळी गोंधळ निर्माण होत आहे. शिधापत्रिका असूनही काही नागरिकांना धान्यापासून वंचीत रहावे लागत आहे. धान्य वाटपात होत असलेल्या अनियमीततेच्या तक्रारीही पुरवठा विभागाकडे वांरवार येत आहेत.९१ टक्के वाटप; ३३ हजार लाभार्थी वंचीतअंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील ३ लाख ९७ हजार ३७७ कार्डधारकांपैकी ३ लाख ६३ हजार ६३० कार्डधारकांमधील प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदुळ मोफत देण्यात आला आहे. ९१ टक्के लाभार्थ्यांना ८३२२.५ मे. टन तांदूळ वितरण झालेला आहे. त्यामुळे सध्या ३३ हजार ७४७ लाभार्थी मोफत धान्यापासून वंचीत आहेत.

केशरी शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य नाहीएपीएल शेतकरी (केशरी) योजनेचे व उर्वरित एपीएल (केशरी) एनपीएस योजनेचे लाभार्थी पाच किलो मोफत तांदुळ घेण्यास पात्र नाहीत. त्यामुळे त्यांना मोफत तांदुळ दिल्या जात नाही. इतर लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरळीत सुरू आहे.- गणेश बेल्लाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा